जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / घरच्यांचा विरोध पत्करुन केलं Love Marriage, पण 5 महिन्यातच घडलं भयानक

घरच्यांचा विरोध पत्करुन केलं Love Marriage, पण 5 महिन्यातच घडलं भयानक

क्राईम न्यूज

क्राईम न्यूज

प्रेम विवाह केल्यानंतर एका तरुणीसोबत धक्कादायक घटना घडली आहे.

  • -MIN READ Local18 Pilibhit,Uttar Pradesh
  • Last Updated :

सैयद कयूम रज़ा, प्रतिनिधी पिलीभीत, 30 मे : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्या तसेच खून, बलात्काराच्याही घटना समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेम विवाह करणे एका तरुणीच्या चांगलेच भारी पडले आहे. काय आहे संपूर्ण घटना - उत्तर प्रदेशातील पिलीभीतमध्ये एका तरुणीला प्रेमविवाह करणे महागात पडले. प्रेमविवाहाचा राग आल्याने तरुणीच्या घरच्यांनी तिच्याशी असलेले नाते कायमचे संपवले होते. तर त्याच वेळी, आता प्रियकर बनलेल्या पतीने देखील एकत्र राहण्यास नकार दिला. सासर आणि माहेरच्या मंडळींकडून दुखावल्यामुळे नवविवाहित महिलेने ब्लेडने हाताची नस कापून टाकली. तर या घटनेची माहिती मिळताच पोलीस तेथे पोहोचले आणि त्यांनी मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर येथे उपचार सुरू आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

जेहानाबाद पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या अनमोलने डिसेंबर 2022 मध्ये अमन कश्यपसोबत प्रेमविवाह केला होता. यामुळे अनमोलचे कुटुंब संतप्त झाले आणि त्यांनी तिच्यासोबतचे नाते संपवले. प्रेमविवाहानंतर काही दिवस सर्व काही सुरळीत चालले, पण आता प्रियकर नवरा अमन कश्यपनेही अनमोलला सोबत ठेवण्यास नकार दिला. यामुळे दुखावलेल्या अनमोलने पती अमनच्या घराबाहेर ब्लेडने हाताची नस कापली. जास्त रक्तस्त्राव झाल्याने ती बेशुद्ध झाली. माहितीवरून पोलीस ठाणे गाठल्यानंतर पोलिसांनी त्याला सीएचसी जहानाबाद येथे दाखल केले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात