चोरीचा व्हिडीओ समोर
मुंबई, 30 जून : चोरीसंबंधीतचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील किंवा यासंबंधीत तुम्ही बरंच ऐकलं देखील असेल. पण सध्या समोर आलेला व्हिडीओ काही वेगळात आहे. या व्हिडीओत चोरी करताना चोर असं काहीतरी पाहातात की ते चोरी केलेली बॅग पुन्हा तरुणीला देऊन निघून जातात. आता हे ऐकल्यावर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल की असं का? हा कोणता चमत्कार आहे की चोरांनी घेतलेली बॅग पुन्हा दिली? तर यामागचं कारण आहे तरुणीचा बॉयफ्रेंड. दुचाकी चोरीसाठी चोरींनी वापरली अनोखी शक्कल, संपूर्ण प्रकार कॅमेरात कैद खरंतर जेव्हा चोरीची घटना घडली तेव्हा या तरुणीचा बॉयफ्रेंडजवळ होता. पण त्याने तरुणीला सोडून पळ काढला ज्यामुळे चोरांना दया आली आणि त्याने तरुणीला बॅग पुन्हा दिली. नक्की काय घडलं? व्हिडीओमध्ये एक मुलगी आणि मुलगा रस्त्यावरून चालताना दिसत आहे. दरम्यान, मागून दुचाकीस्वार दोन चोरटे आले. दुचाकीस्वार तरुण मुला-मुलीच्या जवळ येताच त्यांनी धमकावून त्यांच्या मौल्यवान वस्तू हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बॉयफ्रेंड आपले दोन्ही हात वर करून थांबतो आणि त्याच्या गर्लफ्रेंडला तिथेच टाकून पळ काढतो. Video Viral : चोरांची इमानदारी ज्यांना लूटायचं होतं, त्यांनाच देऊन गेले शंभराची नोट घाबरलेली तरुणी अखेर आपली हँडबॅग स्वत:हून दरोडेखोराकडे देते आणि पळून जाणाऱ्या बॉयफ्रेंडकडे बघत राहते. तिच्यासोबत असा प्रकार होताना पाहून चोरांनी तिची दया येते आणि ते अखेर तिची बॅग तिला परत करताता. त्यापैकी एक चोर तिच्या कानात बॉयफ्रेंडबद्दल काहीतरी सांगत असतो.
हा व्हिडीओ @GarufaCapitan नावाच्या अकाउंटवरुन सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. ही घटना जवळच्या इमारतीत बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या व्हिडीओला असंख्य लोकांनी पाहिलं आहे. लोक या व्हिडीओवर भरभरुन कमेंट्स करत आहेत.