JOIN US
मराठी बातम्या / Viral / अरे बापरे! तरुणी अंघोळ करताना बाथरूममध्ये आली भलीमोठी 'पाल'; पुढे काय घडलं पाहा VIDEO

अरे बापरे! तरुणी अंघोळ करताना बाथरूममध्ये आली भलीमोठी 'पाल'; पुढे काय घडलं पाहा VIDEO

बाथरूममध्ये घुसलेल्या मोठ्या पालीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

जाहिरात

बाथरूममध्ये भलीमोठी पाल. (फोटो - इन्स्टाग्राम व्हिडीओ ग्रॅब)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 18 जून : तुम्ही बाथरूममध्ये गेलात आणि भिंतीवर एखादी छोटीशी पाल असेल… अनेकांना पालीची भीती वाटते. तसं पाल काहीच करत नाही पण तरी ती अगदी छोटीशी असली तरी तिला लोक घाबरतात. मग विचार करा या छोट्याशा पालीच्या जागी भलीमोठी पाल असेल तर… फक्त कल्पना करूनच तुम्हाला घाम फुटला ना? एका तरुणीसोबत असं घडलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. तरुणी बाथरूममध्ये अंघोळ करत होती. तेव्हा अचानक भल्यामोठ्या पालीची एंट्री झाली. बाथरूममध्ये मोठी पाल घुसली. खिडकीतून ही पाल बाथरूममध्ये आली. तेव्हा तरुणी तिथंच होती. पाल इतकी मोठी होती की तरुणीला तिथून पळताही येत नव्हतं. ती तिथंच अडकली होती. हा संपूर्ण थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यानंतर नेमकं काय घडलं ते व्हिडीओतच पाहा. सांगा पाहू कोण आहे हा प्राणी? योग्य उत्तर देणाऱ्याला मिळणार बक्षीस व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, बाथरूममध्ये एक खिडकी आहे. त्या खिडकीतूनच ही पाल बाथरूमच्या आत घुसली. तिथं भिंतीवर साबण, शाम्पू अशा बाथरूममध्ये आवश्यक असलेलं सामान ठेवण्यात आलं आहे. आपली भलीमोठी जीभ बाहेर काढत पाल त्या वस्तू चाटताना दिसते आहे. तिथं तिच्या समोरच ती तरुणी आहे, जी अंघोळ करते आहे. तरुणी या व्हिडीओत दिसत नाही आहे. पण तिचा आवाज ऐकू येतो आहे. ती खूप घाबरली आहे, ओरडते आहे. पालीला बाहेर हाकलण्याचाही प्रयत्न करते आहे. पण पाल काही जात नाही. जसजशी पाल आणखी आत येते, तसतशी तरुणी आणखी घाबरते. काही वेळाने ती बाथरूममधून तशीच पळत बाहेर पडते. इवलासा म्हणून शिकार केली, पण छोटाशा पक्षीही बिबट्यावर पडला भारी; कसं वाचवलं स्वतःला पाहा VIRAL VIDEO तुम्ही नीट पाहिला असेल तर खरंतर ही मोठी पाल नाही तर पालीसारखा असलेला मोठा प्राणी आहे. ज्याला घोरपड म्हणतात.

संबंधित बातम्या

@rumahkumuh.id नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. बहुतेक युझर्सनी ही घटना ऑस्ट्रेलियातील असल्याचं सांगितलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या