शिखा श्रेया, प्रतिनिधी रांची, 5 जून : ‘मानलं तर भूत आहे, मानलं तर नाही’, असं म्हटलं जातं. परंतु तरीही रात्रीच्या वेळी एखाद्या सुनसान ठिकाणी गेल्यावर अचानक जोरदार पाऊस आला आणि नारळाची झावळी झपकन् आपल्या पुढ्यात पडली तर…भल्याभल्यांना थरकाप भरेल. एकूणच काय, भूत या संकल्पनेने आपण सर्वचजण कमी-अधिक प्रमाणात घाबरतो. केवळ झारखंडच्या रांचीपासून 40 किलोमीटरवर असलेल्या खुंटी जिल्ह्यातील ‘भूत’ गावातील लोक भुताला घाबरतात की नाही, याबाबत जरा शंकाच आहे. कारण या गावातल्या प्रत्येक घरासमोर कबर असते, तीही ‘भूताची कबर’. घरात लहान मुलाचं बारसं असो किंवा मोठ्या घराचा गृहप्रवेश असो, या कबरेवर भूताची पूजा केल्याशिवाय इथलं पानही हलत नाही. कोणत्याही शुभकार्यात इथले लोक भूताला विसरत नाहीत. खरंतर भूताच्या आशीर्वादानेच गावात सुख आहे, सगळेजण आनंदात आहेत, असं इथले लोक मानतात.
‘भूत’ प्रकरण नेमकं आहे तरी काय? आपण ज्या भूताला भूत म्हणतो, तो भूत येथील लोक मानतच नाहीत. तर, भूत म्हणजे त्यांच्यामते देव असतो. आपण जसे आपल्या दिवंगत पूर्वजांचे फोटो घरात लावतो आणि त्यांचे आशीर्वाद घेतो. अगदी त्याचप्रमाणे इथले लोक त्यांच्या पूर्वजांच्या कबरी अंगणात बांधतात आणि त्यांना देव म्हणजेच भूत मानून त्यांचे आशीर्वाद घेतात. घरात कोणत्याही व्यक्तीचं निधन झालं की तिची कबर अंगणात बांधण्याची प्रथा या गावात शेकडो वर्षांपासून चालत आली आहे. Ruturaj Gaikwad & Utkarsha Pawar Wedding : लग्नात ऋतुराज गायकवाडच्या पत्नीचा हटके लूक, मंगळसूत्राच डिझाईन पाहिलंत का? कबरीवर निधन झालेल्या व्यक्तीबद्दल माहिती लिहिलेली असते. त्या व्यक्तीचा जन्म कधी झाला, कुठे झाला, व्यक्ती किती वर्ष जगली, त्यांचं निधन कधी झालं, त्यांच्यावर अंत्यसंस्कार कोणी केले, त्यांचं श्राद्ध कोणी केलं, त्यासाठी खर्च कोणी केला, अशी संपूर्ण माहिती कबरीवर नमूद केलेली असते. दरम्यान, या परंपरेमुळेच या गावाला ‘भूत’ असं नाव पडलं आहे.