JOIN US
मराठी बातम्या / Viral / Viral Video: हे काय! आधी ग्लासातून स्वतःच दारू प्यायली; मग नशेत माकडाने काय केलं पाहा

Viral Video: हे काय! आधी ग्लासातून स्वतःच दारू प्यायली; मग नशेत माकडाने काय केलं पाहा

एका माकडाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला नक्कीच हसू येईल. या व्हिडिओमध्ये एक माकड माणसांप्रमाणेच दारू पिताना दिसत आहे.

जाहिरात

माकड दारूच्या नशेत

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 22 जून : हे जग विविध प्रकारच्या प्राण्यांनी भरलेलं आहे. त्यापैकी काही प्राणी हिंस्त्र असतात तर, काही शांत. काही अतिशय खोडकरही असतात. पृथ्वीवरील सर्वात खोडकर प्राण्यांमध्ये माकडांचं नाव देखील आहे. माकडं असं काहीतरी करतात, जे पाहून रागही येतं आणि मग हसूही आवरत नाही. तुम्ही पाहिलं असेल की अनेकदा माकडं घरात घुसतात आणि खाण्यापिण्याची किंवा इतर वस्तू उचलून पळून जातात. माकडं शहरांमध्ये क्वचितच दिसतात, परंतु त्यांच्या मजेदार खोड्या खेड्यात अनेकदा पाहायला मिळतात. मृत्यूनंतरही पक्ष्याने जोडीदाराची साथ सोडली नाही; VIDEO पाहून डोळ्यात पाणी येईल सध्या अशाच एका माकडाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला नक्कीच हसू येईल. या व्हिडिओमध्ये एक माकड माणसांप्रमाणेच दारू पिताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, माकड प्लास्टिकचा ग्लास घेऊन बसलं आहे आणि एक व्यक्ती दारूच्या बाटलीतून त्याच्या ग्लासमध्ये दारू ओतत आहे. त्यानंतर माकड एखाद्या दारूड्याप्रमाणे एका दमात संपूर्ण दारू पितं. मद्यपान केल्यानंतर तो पुन्हा ग्लास पुढे सरकवतो, त्यानंतर ती व्यक्ती पुन्हा बाटलीतून दारू त्याच्या ग्लासमध्ये ओतते आणि तो पुन्हा ती पिऊन टाकतो. दोन पेग पिऊन झाल्यावर तो ग्लास तिथे ठेवतो आणि पूर्ण शांत होतो.

संबंधित बातम्या

व्हिडिओ पाहून असं वाटतं की त्याने आणखीही दारू प्यायली असावी, पण व्हिडिओमध्ये ते पुढे दाखवलेलं नाही. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर चांगलाच व्हायरल होत आहे. @HasnaZarooriHai नावाच्या अकाऊंटवरुन तो शेअर करण्यात आला असून, ‘हा आत्ताच आदिपुरुष पाहून आला आहे, आता डोकेदुखी थांबवत आहे’ असे मजेशीरपणे लिहिले आहे. अवघ्या 33 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 29 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाइकही केले आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी मजेशीर पद्धतीने वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या