JOIN US
मराठी बातम्या / Viral / कधी चिंपांझीला गाडी दुरुस्त करताना पाहिलंय? मालकाला मदत करताना Video Viral

कधी चिंपांझीला गाडी दुरुस्त करताना पाहिलंय? मालकाला मदत करताना Video Viral

माकडांच्या अनेक प्रजाती असतात. पण त्यातही चिंपांझी हे सगळ्यात हुशार असल्याचं सिद्ध झालंय. हा व्हायरल व्हिडीओ तुमचा दिवस बनवेल.

जाहिरात

व्हायरल व्हिडीओ

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 09 जुलै : शाळेतही शिकवलं गेलं आणि त्याआधी आजी सांगायची त्या रामायणासारख्या पौराणिक कथांमध्येही ऐकलं की, माणसाची उत्पत्ती ही माकडांपासून झाली आहे. पण या सगळ्याव्यतिरिक्त ‘मानवाची उत्पत्ती माकडापासून झाली’ या वाक्यावर विश्वास तेव्हा बसतो, जेव्हा हुशार माकडं दिसतात. सोशल मीडिया वापरताना अनेकदा अशा माकडांचे व्हिडीओ आपण पाहिलेले असतील. आताही असाच एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. ज्यात एक चिंपांझी चक्क कार दुरूस्त करताना दिसतोय! माकडांच्या अनेक प्रजाती असतात. पण त्यातही चिंपांझी हे सगळ्यात हुशार असल्याचं सिद्ध झालंय. म्हणजे हे असं माकड आहे, ज्याला मानवी भावना पूर्णत: समजतात. खेळणं, जेवणं ते रडणं अशा सगळ्या मूड्समध्ये चिंपांझी म्हणजे परफेक्ट साथीदार. म्हणूनच अनेकजण चिंपांझीला पाळताना देखील दिसतात. अर्थात हे भारताच्या बाहेर जमतं. भारतात प्राण्यांबद्दल नियम जरा कडक आहेत. तरुणाचा तो सेल्फी शेवटचाच, हत्तीजवळ गेला आणि धक्कादायक घडलं अशाच एका पाळीव चिंपांझीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर फिरतोय. व्हिडीओच्या सुरूवातीला एक तरूण कारचं चाक बदलताना दिसतोय. तो स्क्रुड्रायवर मागण्यासाठी हात समोर करतो आणि तितक्यात एक चिंपाझी त्याला स्क्रुड्रायवर देताना दिसतोय इतकंच नाही तर हा चिंपाझी त्याला नटबोल्ट फिट करण्यासाठी मदत करतानाही दिसतोय.

संबंधित बातम्या

या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान तो तरूण आणि चिंपांझीमध्ये संभाषण सुरू असतं. तरूण त्याला शिकवताना दिसतोय. r"हे काम करताना खुप काळजी घेण्याची गरज आहे" असं जेव्हा तरूण सांगतो, तेव्हा चिंपांझी शांत ऐकत मान हलवतो. या दोघांमधली मस्ती आणि काम यातून त्यांचं जाम भारी बॉंडिंग दिसून येतंय. Viral Video : गाढ झोपलेल्या वाघासमोर हरणाची एन्ट्री, पुढे जे घडलं त्यावर विश्वास बसणार नाही हा व्हिडीओ बघून नेटकरी कमेंट्सचा वर्षाव करताय. कुणी म्हणतंय “चिंपांझी इंजिनिअरिंग शिकताना” तर कुणी “त्याने नंतर हात धुतले का?” असा प्रश्न देखील केलाय. तर एका युजरने “हे दिसायला छान असलं तरी मुक्या जनावरांच्या हाती अशा धोकादायक वस्तू देणं योग्य नाही, त्यांना इजा होऊ शकते” असं म्हणत काळजी देखील व्यक्त केली आहे. असं असलं तरी हा चिंपांझी खुप हुशार आहे, हे मात्र नक्की!

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या