JOIN US
मराठी बातम्या / Viral / मांजरीने पंजाने हल्ला करताच फरशीवर गोल-गोल फिरू लागला कुत्रा, मजेशीर भांडणाचा VIDEO

मांजरीने पंजाने हल्ला करताच फरशीवर गोल-गोल फिरू लागला कुत्रा, मजेशीर भांडणाचा VIDEO

या व्हिडिओमध्ये हे दाखवण्यात आलं आहे की भांडणानंतर मांजरीचे़ं लक्ष विचलित करण्यासाठी एक कुत्रा विचित्र वागू लागतो. जे पाहून मांजरही गोंधळून जाते.

जाहिरात

कुत्रा-मांजरीची मजेशीर भांडणं

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 07 मे : मांजर आणि कुत्रा हे एकमेकांचे शत्रू मानले जातात. ते कधीच एकमेकांच्या सोबत येत नाहीत, असं आपण अनेकदा पाहिलं आणि ऐकलं आहे. मात्र अनेक घरांमध्ये हे दोन प्राणी एकत्र वाढताना दिसतात आणि असे अनेक व्हिडिओदेखील सोशल मीडियावर उपलब्ध आहेत जे या दोघांचं चांगलं बॉन्डिंग देखील दर्शवतात. पण सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ जरा वेगळा आहे. VIDEO - खतरनाक किंग कोब्राला कारमधून खेचून तर काढलं पण…; पुढच्या क्षणी जे घडलं ते थरकाप उडवणारं या व्हिडिओमध्ये हे दाखवण्यात आलं आहे की भांडणानंतर मांजरीचे़ं लक्ष विचलित करण्यासाठी एक कुत्रा विचित्र वागू लागतो. जे पाहून मांजरही गोंधळून जाते. ट्विटरवर शेअर केलेल्या या पाळीव प्राण्यांच्या व्हिडिओमध्ये एक कुत्रा आणि मांजर दाखवण्यात आले आहेत, जे काही वेळाने एकमेकांशी भांडू लागतात. यादरम्यान मांजर कुत्र्यावर भारी ठरताना दिसते आणि त्याला पंजा मारते. मग कुत्रा मांजरीचं लक्ष विचलित करण्यासाठी काहीतरी नवीन करण्याचा विचार करतो आणि जमिनीवर गोल-गोल फिरू लागतो. हे पाहून असं वाटतं जणू तो प्रदक्षिणा घालत आहे.

संबंधित बातम्या

हे पाहून मांजरही गोंधळून जाते आणि कुत्र्याला हे करताना पाहून तिची प्रतिक्रिया पाहण्यासारखी आहे. हा कुत्रा-मांजराचा व्हिडिओ इतका मजेदार आहे, की तुम्हाला तो अनेक वेळा लूपमध्ये पाहायला आवडेल. हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला पोट धरून हसायला भाग पाडेल. हा व्हिडिओ ट्विटरवर @buitengebieden नावाच्या पेजद्वारे शेअर केला गेला आहे, ज्यावर अनेकदा असे मनोरंजक आणि मजेदार व्हिडिओ आपल्या पाहायला मिळतात. या क्लिपला शेअर केल्यापासून आतापर्यंत 1.6 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. म्हणजेच 16 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. त्याचबरोबर या व्हिडिओला जवळपास 60 हजार लाईक्सही मिळाले आहेत. यावरुनच अंदाज येतो, की हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या