JOIN US
मराठी बातम्या / Viral / अबजच! जेलमध्ये मैत्री अन् बाहेर आल्यावर झाले एकमेकांचे सोयरे, वाचा नेमकं काय झालं?

अबजच! जेलमध्ये मैत्री अन् बाहेर आल्यावर झाले एकमेकांचे सोयरे, वाचा नेमकं काय झालं?

विवाह हा दोन कुटुंबांना जोडणारा एक धागा असतो. यामुळे नवं नातं तयार होतं. काही जोडप्यांच्या विवाहामागे खास अशी कहाणी असते. एखाद्या अचानक घडलेल्या प्रसंगामुळे आयुष्याचा जोडीदार मिळाल्याचं काही जणांच्या बाबतीत घडतं.

जाहिरात

जेल

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी : विवाह हा दोन कुटुंबांना जोडणारा एक धागा असतो. यामुळे नवं नातं तयार होतं. काही जोडप्यांच्या विवाहामागे खास अशी कहाणी असते. एखाद्या अचानक घडलेल्या प्रसंगामुळे आयुष्याचा जोडीदार मिळाल्याचं काही जणांच्या बाबतीत घडतं. उत्तर प्रदेशात एका व्यक्तीच्या विवाहामागे अशीच एक खास कहाणी आहे. या कहाणीत मैत्रीचं रुपांतर नात्यात झालं आहे. पण या कहाणीची सुरूवात कारगृहात झाली. दोन कैद्यांची एकमेकांशी चांगली मैत्री झाली. या दोन्ही कैद्यांना आपल्या मुलांच्या लग्नाची चिंता सतावत होती. त्यांनी मैत्रीचं रुपांतर नात्यात करण्याचा निर्णय घेतला. शासनाने या कैद्यांना पॅरोलवर सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या दोन्ही कैद्यांनी आपल्या मुलांच्या विवाहाचे सर्व विधी पूर्ण केले. विशेष म्हणजे नवरा मुलगादेखील कारागृहात एका गुन्ह्यासाठी शिक्षा भोगत होता. त्याची शिक्षा संपताच हा विवाहसोहळा पार पडला. `नवभारत टाइम्स`ने या विषयीचे वृत्त दिले आहे. हेही वाचा -  Viral Video : कोब्राला पाहून सिंहांची हवा झाली टाईट, पुढे जे घडलं पाहून व्हाल थक्क उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्हा कारागृहाच्या इतिहासात बुधवारी एक नवा अध्याय लिहिला गेला. कौशांबी जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत असलेले दोन कैदी एकमेकांचे नातेवाईक बनले. कारगृहातच या दोघांनी आपल्या मुला-मुलीचे लग्न निश्चित केले. त्यानंतर सरकारने त्यांना पॅरोलवर सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर या अनोख्या नात्याचे सर्व विधी पार पडले. बुधवारी अर्जुन सिंह यादव आणि धारा सिंह या दोन कैद्यांना त्यांच्या मुला-मुलीच्या विवाहासाठी पॅरोलवर सोडण्यात आलं. बुधवारी रात्री धारा सिंहचा मुलगा सुमित अर्जुन सिंहच्या घरी विवाहासाठी वरात घेऊन गेला. विवाह सोहळ्यातील विधी करण्यासाठी पोलीस अर्जुन सिंह आणि धारा सिंह यांना घेऊन त्यांच्या घरी पोहोचले. प्रभारी जेलर भूपेश सिंह यांनी सांगितले की, ``सरकारने मंजूर केलेल्या पॅरोल आदेशानुसार आरोपींची सुटका करण्यात आली आहे. अर्जुन सिंहला 21 दिवसांच्या तर धारा सिंहला चार दिवसांच्या पॅरोलवर सोडण्यात आले आहे. विवाहाचे विधी पार पाडण्यासाठी हा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे.`` दरम्यान, हा विवाह निश्चित होण्यामागे खास अशी कहाणी आहे. पिपरी पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील कटहुला गावातील सुमित सिंह आणि धारा सिंह हे पिता-पुत्र काही वर्षांपूर्वी एका हत्याकांडात दोषी ठरले. याप्रकरणी न्यायालयाने त्यांना दहा वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे हे दोघे कारागृहात शिक्षा भोगत होते. कारागृहात धारा सिंहची ओळख अकिल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अतरसुइया गावातील अर्जुन सिंहशी झाली. अर्जुन सिंह यादव हा गावातील एका हत्या प्रकरणात न्यायालयाने ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. हत्या प्रकरणातील या दोन्ही आरोपींच्या ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले.

हे दोघेही वृ्द्धत्वाकडे झुकत असल्याने त्यांना मुलांच्या लग्नाची चिंता सतावत होती. त्यामुळे या दोघांनी कारागृहातच आपल्या मुलांचे लग्न निश्चित केले. धारा सिंहचा मुलगा सुमित सिंह देखील कारागृहात शिक्षा भोगत होता, मात्र शिक्षेचा कालावधी संपल्याने त्याची कारागृहातून सुटका झाली. या निमित्ताने अर्जुन सिंहला त्याच्या मुलीसाठी तो योग्य वर वाटला. अखेर अर्जुन सिंह आणि धारा सिंह यांच्या कारागृहातील मैत्रीचे रुपांतर नात्यात झाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या