नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी : सिंहाला जंगलातील सर्वात ताकदवर आणि भयावह प्राणी म्हटलं जातं. त्याला पाहून अनेकांच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. जंगलातील प्राण्यांना समोरुन पहायची हिंमत नसली तरी अनेकांना त्यांचे फोटो व्हिडीओ पाहण्यामध्ये खूप रस असतो. सोशल मीडियावर तर त्यांचे खूप व्हिडीओ फिरत असतात. खास करुन जंगली प्राण्यांच्या शिकारीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. आता सिंह आणि कोब्राचा एक व्हिडीओ समोर आला आहे. जो सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्यें एका कोब्राने सिंहांची हवा टाईट केली आहे. व्हिडीओमध्ये दिसतंय की, दोन सिंहिण कुठेतरी जात असताना वाटेत एक कोब्रा येतो. कोब्रा पाहून सिंहिण घाबरतात आणि जागेवरच थांबतात. थोड्यावेळातच कोब्रा तेथून निघून जातो. कोब्रानंतर सरडा तिथे येतो. अगदी काही वेळाचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. कोब्राला पाहून भल्यामोठ्या सिंहिणदेखील दबकल्या त्यामुळे व्हिडीओ पाहण्यास नेटकऱ्यांना मजा येत आहे.
हा व्हिडिओ daniel_wildlife_photography नावाच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओवर खूप साऱ्या प्रतिक्रियाही पहायला मिळतायेत. अनेकजण म्हणतायेत की, जंगलातील धोकायदायक प्राण्यांनाही माहिती आहे की कोब्रा किती विषारी आणि धोकादायक ठरु शकतो.
दरम्यान, सोशल मीडियावर समोर आलेल्या शिकारींच्या व्हिडीओंमध्ये काही शिकारीमध्ये विजयी होतात तर काही आपला जीव वाचवण्यासाठी शेवटपर्यंत लढा देतात आणि आपला जीव वाचवतात. त्यामुळे असे व्हिडीओ पाहण्यास नेटकरी कायमच उत्सुक असतात की कोण कोणावर भारी पडेल. काही क्षणात व्हायरल होणारे हे व्हिडीओ खूप चर्चेत असतात.