JOIN US
मराठी बातम्या / Viral / 'आयुष्यभर खा Free Pizza, पैसे मृत्यूनंतर द्या'; काय आणि कुठे आहे ही अजब ऑफर

'आयुष्यभर खा Free Pizza, पैसे मृत्यूनंतर द्या'; काय आणि कुठे आहे ही अजब ऑफर

एका पिझ्झा कंपनीने ग्राहकांसाठी आफ्टलाइफ पे ही अजब ऑफर दिली आहे.

जाहिरात

प्रतीकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वेलिंग्टन, 28 मे : पिझ्झा म्हणताच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. आतापर्यंत तुम्ही 99 रुपयांचा पिझ्झा , एका पिझ्झावर एक फ्री अशा ऑफरमध्ये पिझ्झा खाल्ला असेल. पण तुम्हाला कुणी आयुष्यभर पिझ्झा फ्रीमध्ये खायला दिला तर… साहजिकच आश्चर्य वाटेल. कारण काही झालं तरी अशी ऑफर ग्राहकांसाठी फायदेशीर असली तर त्याचा कंपनीला काय फायदा असा प्रश्न येतोच. पण अशी ऑफर दिली आहे ती एका पिझ्झा कंपनीने. आतापर्यंत तुम्ही बाय वन गेट वन फ्री,  बाय नाऊ पे लेटर अशा किती तरी ऑफर्स तुम्हाला माहिती असतली. पण आता आफ्टरलाइफ पे अशीही ऑफर निघाली आहे. या ऑफर अंतर्गतच तुम्हाला हा फ्री पिझ्झा खायला मिळणार आहे.  एका पिझ्झा कंपनीने ही अनोखी ऑफर दिली आहे, ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.  या ऑफरअंतर्गत तुम्हाला आयुष्यभर फ्री पिझ्झा खायला मिळणार आहे. पण मृत्यूनंतर मात्र तुम्हाला बिल चुकवावं लागले. आता हे कसं शक्य आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

तर कंपनीच्या  वेबसाईटमध्ये दिलेल्या माहितीनुसार ही ऑफर फक्त 666 ग्राहकांसाठी आहे. यासाठी ग्राहकांना एक अॅग्रिमेंट साइन करावं लागेल. ज्यात ते मरणानंतर पिझ्झाचं बिल चुकवतील. 4 जूनपर्यंत चिकन-मटण काही खायला मिळणार नाही; इथं सरकारने घातली बंदी कारण… पिझ्झा कंपनीने सांगितलं की यात काही हिडेन चार्ज किंवा पेनाल्टी नाहीत. ऑफर घेणाऱ्यांना अॅग्रिमेंटनुसार ज्याने जिवंत असताना पिझ्झाचं बिल चुकवलं नाही, त्याच्या  मृत्यूपत्रात बदल केले जातील आणि त्यात पिझ्झाचा चार्ज जोडला जाईल. यावर कोणतंही व्याज किंवा अतिरिक्त फी आकारली जाणार नाही. दरम्यान ग्राहक संरक्षण विभागाने या ऑफरचा अभ्यास केला आणि यामुळे व्यसन लागण्याचा आणि यामुळे कर्जात बुडण्याचा धोका वर्तवला. त्यामुळे ग्राहकांनी फ्री पिझ्झाच्या या ऑफरला बळी पडू नये, असा सल्ला दिला आहे. काही असलं तरी फ्रीमध्ये पिझ्झा खाण्याचा मोह कुणालाच आवरणार नाही. त्यामुळे आता ही अजब ऑफर कोणत्या पिझ्झा कंपनीची आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल. तर ही ऑफर आहे न्यूझीलंडमधील एका पिझ्झा कंपनीची. पण ही ऑफर फक्त न्यूझीलंडमध्येच आणि न्यूझीलंडवासियांसाठीच लागू आहे. त्यामुळे तुम्हाला याचा काही फायदा नाही. फक्त 27 मिनिटांत भलीमोठी नॉनव्हेज थाळी फस्त; रेकॉर्डही झाला, पण शेवटी अशी अवस्था झाली की… पण तरी अशी ऑफऱ तुम्हाला कुणी दिली तर तुम्ही ती स्वीकारणार का? आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या