मराठी बातम्या /बातम्या /Viral /फक्त 27 मिनिटांत भलीमोठी नॉनव्हेज थाळी फस्त; रेकॉर्डही झाला, पण शेवटी अशी अवस्था झाली की...

फक्त 27 मिनिटांत भलीमोठी नॉनव्हेज थाळी फस्त; रेकॉर्डही झाला, पण शेवटी अशी अवस्था झाली की...

27 मिनिटांत भलमोठी नॉनव्हेज थाळी संपवली. (फोटो सौजन्य - Kennedy News and Media)

27 मिनिटांत भलमोठी नॉनव्हेज थाळी संपवली. (फोटो सौजन्य - Kennedy News and Media)

खाण्याच्या रेकॉर्डच्या नादात व्यक्तीची शेवटी भयंकर अवस्था झाली.

लंडन, 26 मे : सर्वात आधी कोण, किती जेवतं ते पाहुयात... अशी स्पर्धा तुम्ही कधी ना कधी कुणासोबत तर लावली असेल. विशेषतः जेव्हा तुम्ही लहान होता तेव्हा तुम्ही खायला हवं म्हणून तुमच्या पालकांनी असं सांगून भरपूर खायला लावलं असेल. पण एका व्यक्तीने हे केलं ते विक्रमासाठी. रेकॉर्डसाठी त्याने कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त खाण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला वाचूनच आश्चर्य वाटेल त्याने भलीमोठी नॉनव्हेज थाळी फक्त 27 मिनिटांत फस्त केली. पण रेकॉर्डच्या नादात शेवटी त्याची अवस्था भयंकर झाली.

जगात असे अनेक लोक आहेत जे खाण्यापिण्याचे शौकीन आहेत. काही जण तर खास डिशसाठी हजारो किलोमीटरचा प्रवास करतात. आजकाल सोशल मीडिया विविध प्रकारच्या फूड ब्लॉगर्सने भरलेला आहे. काही अनोखे पदार्थ हनवताना दाखवतात, काही भरपूर खायला बसतात. लोकांना या फूड चॅलेंजचे व्हिडिओ खूप आवडतात. अशीच खवय्या असलेली यूकेतील एक व्यक्ती जिने खाण्याचा रेकॉर्ड केला.

दक्षिण-पश्चिम इंग्लंडमधील रहिवासी असलेल्या मॅक्स स्टॅनफोर्डने नुकताच एक विक्रम केला. मॅक्सने 4500 कॅलरीजची नॉनव्हेज ग्रिल थाली अवघ्या 27 मिनिटांत संपवली. यापूर्वी हा विक्रम ज्या व्यक्तीच्या नावावर होता त्याने तो 44 मिनिटांत पूर्ण केला होता. हा रेकॉर्ड मोडत मॅक्सने नवा रेकॉर्ड रचला खरा. पण त्यानंतर त्याची अवस्था मात्र भयंकर झाली.

440 वोल्टचा झटका देणारं ऑम्लेट; VIDEO पाहून सांगा तुम्ही खाणार का?

मॅक्सनं सांगितलं की, त्याने हा विक्रम केला होता पण त्यानंतर परिस्थिती आणखीनच बिकट झाली. त्याच्या पोटात खूप दुखत होतं. ताट संपवून तो अंधाऱ्या खोलीत झोपण्याचा प्रयत्न करत होता. पण पोटदुखीने त्याचा बँड वाजवला. त्याने पहिल्यांदाच असं चॅलेंज घेऊन ते पूर्ण केलं असं नाही. याआधीही त्याने अनेक प्रकारचे फूड चॅलेंज पूर्ण केले आहेत. पण यावेळी त्याने सरासरी व्यक्तीच्या दुप्पट कॅलरी खाण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे त्याची चांगलीच वाट लागली.

काय सांगता! तुपासह हे 5 भारतीय पदार्थ परदेशात बॅन; कारणही चक्रावून टाकणारं

तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतल कुणी कधी असं कोणतं फूड चॅलेंज घेतलं होतं का? त्यावेळी तुमची किंवा त्यांची काय अवस्था झाली होती, ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

First published:
top videos

    Tags: Food, Record, Viral