JOIN US
मराठी बातम्या / Viral / गर्लफ्रेंडला भेटायला गेला तरुण, पहिल्याच डिनर डेटला केलं असं काही की तरुणीला धक्काच बसला

गर्लफ्रेंडला भेटायला गेला तरुण, पहिल्याच डिनर डेटला केलं असं काही की तरुणीला धक्काच बसला

तरुणीने तिच्या पोस्टमध्ये सांगितलं आहे की, ती ज्या मुलासोबत डेटवर गेली होती तो रेस्टॉरंटमध्ये आधीच उपस्थित होता. त्याने सांगितलं की त्याने आपल्या रूममेट्ससाठी काही जेवण ऑर्डर केलं आहे आणि ते त्यांना देऊन तो परत येत आहे.

जाहिरात

पहिल्याच डेटला विचित्र घडलं

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 15 मे : जर एखादी व्यक्ती एखाद्यासोबत पहिल्या डेटवर जात असेल तर तो खूप उत्साही राहतो. प्रत्येकजण यावेळी सर्वोत्तम दिसण्याचा आणि सर्वोत्तम छाप पाडण्याचा प्रयत्न करतो. तर, कधी कधी असं काही घडतं, की तुम्ही स्वतः सर्व प्रयत्न करता, परंतु समोरच्या व्यक्तीचं वागणं थोडं विचित्र असतं. मिररच्या रिपोर्टनुसार, मुलीने स्वतः सोशल मीडियावर लोकांना तिच्यासोबत डेटवर घडलेल्या या घटनेबद्दल सांगितलं. तिने सांगितलं की एका मुलाने तिची फसवणूक कशी केली, जेव्हा ती पहिल्या डेटसाठी त्याला भेटायला गेली होती. तुम्हाला या घटनेबद्दल जाणून आश्चर्य वाटेल, कारण आजपर्यंत तुम्ही क्वचितच कोणत्याही मुलाला असं करताना पाहिलं असेल. नवऱ्याने दुसरं लग्न केल्याचा संशय, बायकोने एक दिवस पाठलाग केला; पुढे जे घडलं ते… तरुणीने तिच्या पोस्टमध्ये सांगितलं आहे की, ती ज्या मुलासोबत डेटवर गेली होती तो रेस्टॉरंटमध्ये आधीच उपस्थित होता. त्याने सांगितलं की त्याने आपल्या रूममेट्ससाठी काही जेवण ऑर्डर केलं आहे आणि ते त्यांना देऊन तो परत येत आहे. मुलगी अर्धा तास त्याची वाट पाहत राहिली, नंतर तिला समजलं की त्या मुलाने ऑर्डर केलेल्या जेवणाचं बिल दिलेलं नाही. मुलीची ही पहिलीच ब्लाइंड डेट होती आणि तिच्यासोबत घडलेल्या या घटनेने तिला धक्काच बसला. मुलगी गोंधळून गेल्यावर, वेट्रेसने तिच्याकडे येऊन संपूर्ण प्रकार जाणून घेतला. त्या व्यक्तीने जेवणाचे पैसेही दिले नसल्याची बाब मुलीला त्याचवेळी समजली. वेट्रेस दयाळू निघाली आणि तिने मॅनेजरशी बोलून संपूर्ण प्रकरण सोडवलं आणि मुलीला पैसे द्यावे लागले नाहीत, हे नशीब. तिला मोफत वाईनही देण्यात आली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या