जाहिरात
मराठी बातम्या / Viral / नवऱ्याने दुसरं लग्न केल्याचा संशय, बायकोने एक दिवस पाठलाग केला; पुढे जे घडलं ते...

नवऱ्याने दुसरं लग्न केल्याचा संशय, बायकोने एक दिवस पाठलाग केला; पुढे जे घडलं ते...

प्रतिकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतिकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

संशयी बायको डिटेक्टिव्ह बनली आणि गुपचूप नवऱ्याच्या पाठीमागे गेली. ही स्टोरी सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

हाँगकाँग, 14 मे : पती-पत्नीतील नातं म्हणजे प्रेम आणि विश्वासाचं. कपल च्या या नात्यात संशयाची एंट्री झाली की मग काही खरं नाही. अशीच एक महिला जिला आपल्या पतीवर संशय होता. नवऱ्याने दुसरं लग्न केल्याचा संशय तिला आला आणि तिने नवऱ्याचं सत्य समोर आणण्यासाठी त्याचा पाठलागही केला. पण तिला जे सत्य समजलं त्यामुळे ती चक्रावली. हाँगकाँगमधली ही घटना आहे. महिलेने सांगितलं की, तिचा नवरा नेहमी चीनमध्ये जायचा. तिथंच रात्र घालवायचा. त्याच्यावर तिला आधीपासूनच संशय होता. पण मुलांची काळजी घेताना तिला नवऱ्याचं सत्य समजून घेण्यात वेळ मिळत नव्हता. अखेर एक दिवस तिने आपल्या मुलांना सासूकडे ठेवलं आणि ती नवऱ्याच्या मागे गेली. नवऱ्याचा पाठलाग करत ती चीनपर्यंत पोहोचली.

News18लोकमत
News18लोकमत

तिथं गेल्यानंतर तिने जे पाहिलं ते पाहून ती शॉक झाली. तिचा नवरा कुणा महिलेला नाही तर एका टुरिस्ट गाइडला भेटत होता. तिने याबाबत अधिक माहिती मिळवली. तेव्हा तो चीनमध्ये फ्लॅट घेत असल्याचं तिला समजलं. महिला म्हणाली तिच्या नवऱ्याने तिला नवं घर घ्यायचं असल्याचं सांगितलं होतं, पण तिने नकार दिला होता. अरे हिला आवरा! नवरा ऑफिसहून घरी आल्यावर दरवाजातच बायकोने…; कपलचा ‘तो’ VIDEO VIRAL पण तरी तो आता फ्लॅट का शोधत आहे, चीनमध्ये का राहत आहे, तो आपल्या दुसऱ्या पत्नीसाठी तर घर घेत नाही ना? असा प्रश्न तिला पडला आहे. तिला नवऱ्यालाच याविषयी विचारायचं आहे, पण त्याला आपण पाठलाग करत होतो हे समजेल, जे तिला नको आहे. आता काय करायचं ते तिला समजत नाही आहे. महिलेची पोस्ट वाचल्यावर त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. साऊथ चाइना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार काही युझर्सनी तो रिटायरमेंटची तयारी करत असेल असं म्हटलं आहे. काहींनी तिने नवऱ्याशी बोलावं असा सल्ला दिला आहे. तर काहींनी तो तुला फसवतो आहे, त्यामुळे त्याला सोडून दे असंही म्हटलं आहे. किती सांगायचंय मला! एका बायकोची नवऱ्यासाठी खास पोस्ट; वाचून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल दरम्यान तुमची यावरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात