JOIN US
मराठी बातम्या / Viral / शेवटी आईच ती! कोंबडीला अंडं द्यायला कोंबड्याची गरज नसते, कसं? वाचा...

शेवटी आईच ती! कोंबडीला अंडं द्यायला कोंबड्याची गरज नसते, कसं? वाचा...

शरीरात अंड तयार होण्यासाठी कोंबडीला जास्तीत जास्त कॅल्शियमची गरज असते. आवश्यक तत्व योग्य प्रमाणात मिळाल्यास कोंबडी स्वतः अंड तयार करू शकते.

जाहिरात

चूनखडकात जवळपास 97% कॅल्शियम असतं.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कुष्ण कुमार, प्रतिनिधी नागौर, 02 जुलै : आधी कोंबडी की अंड? या विचित्र प्रश्नाने आपल्याला लहानपणापासून सतावलंय. परंतु तुम्हाला माहितीये का, कोंबडी ही आपल्या शरीरात स्वतः अंड तयार करू शकते. म्हणजेच इतर प्राणी ज्याप्रकारे प्रजननानंतर बाळाला जन्म देतात. तशी कोंबडीही प्रजननाच्या क्रियेनंतर अंडी देते. मात्र ही क्रिया व्हायलाच हवी असं काही नाहीये, तर कोंबडी या क्रियेशिवाय म्हणजेच कोंबड्याशिवायही अंडी देऊ शकते. कसं? जाणून घेऊया… शरीरात अंड तयार होण्यासाठी कोंबडीला जास्तीत जास्त कॅल्शियमची गरज असते. आवश्यक तत्व योग्य प्रमाणात मिळाल्यास कोंबडी स्वतः अंड तयार करू शकते. पशू रोग तज्ज्ञ नरेंद्र चौधरी यांनी याबाबत माहिती दिली आहे. कोंबडीचं अंड तयार होण्यासाठी त्यांनी चूनखडक म्हणजेच लाइमस्टोन हे अतिशय महत्त्वपूर्ण असल्याचं सांगितलं.

भूगर्भात आढळणाऱ्या अतिशय महागड्या चूनखडकात जवळपास 97% कॅल्शियम असतं. त्यामुळे याच खडकाचा वापर कोंबडीची अंडी बनवण्यासाठी केला जातो. नरेंद्र चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, चूनखडकाला मशीनमध्ये अगदी बाजरीच्या दाण्यांप्रमाणे बारीक करून ते दाणे कोंबडीला खायला दिले जातात. दररोज साधारण 7 ते 8 ग्रॅम चूनखडक खाल्ल्यास प्रजननेच्या क्रियेशिवाय कोंबडीच्या शरीरात अंडी तयार होतात. विशेष म्हणजे चूनखडकामुळे कोंबडीच्या आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. शिवाय अंडी तयार होण्यापासून ते अंडी देण्याच्या प्रक्रियेपर्यंत आणि त्यानंतरही कोंबडीच्या जीवाला कोणताही धोका निर्माण होत नाही. बॉयफ्रेंडला जायचे होते सौदीला, पण आधी तिला भेटायला गेला अन् घडलं हादरवणारं कांड दरम्यान, राजस्थानच्या खींवसर भागात असलेल्या बालाजी इंडस्ट्रियलचे मालक नरेश यांनी सांगितलं की, चूनखडक हे प्रत्येक ठिकाणी आढळत नाहीत, त्यामुळे आम्ही भारतातील विविध ठिकाणी खास कोंबडीच्या अंड्यांसाठी चूनखडकाच्या बारीक दाण्यांचा पुरवठा करतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या