JOIN US
मराठी बातम्या / Viral / Flipkart कंपनीचा रस्त्यावर असा प्रकार, ज्यानेही पाहिलं सर्वांनीच मारला डोक्याला हात

Flipkart कंपनीचा रस्त्यावर असा प्रकार, ज्यानेही पाहिलं सर्वांनीच मारला डोक्याला हात

मागच्या काही महिन्यांपूर्वी झोमॅटो आणि ब्लिंकइटने देखील अशी काही होर्डिंग्स लावले होते. जे चर्चेचा विषय ठरले.

जाहिरात

सोर्स : सोशल मीडिया

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 जुलै : तुम्ही अनेक जाहिरातींचे होर्डिंगस रस्त्यावर पाहिले असणार. जे होर्डिंग्स नेहमीच सर्वांचं लक्ष आपल्याकडे वळवतात. आत्तातर या कंपन्यांनी आपली क्रिएटिवीटी दाखवायला देखील सुरुवात केली आहे. ज्यामध्ये कधी 3D प्रिंटिंग तर कधी झुलती एखादी वस्तु ठेवली जाते. सीटीमध्ये अशा प्रकारच्या क्रिएटिव्हिटीचा वापर बऱ्याचदा केला जातो. शिवाय काही शाब्दिक होर्डिंग्स देखील लावल्या जातात, ज्यामुळे ते चर्चेत येतात. मागच्या काही महिन्यांपूर्वी झोमॅटो आणि ब्लिंकइटने देखील अशी काही होर्डिंग्स लावले होते. जे चर्चेचा विषय ठरले. यासंबंधीत काही मीम्स देखील व्हायरल झाले. अशाच एका इ कॉमर्स कंपनीनं आपलं होर्डिंग्स लावलं जे आता चर्चेचा विषय ठरलं आहे. ती रोज खाते टॉयलेट पेपर, महिलेच्या विचित्र व्यसनाचं धक्कादायक कारण समोर ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने मार्केटिंगच्या कलेमध्ये प्रभुत्व मिळवले आहे असे दिसते. कंपनीने उत्तम मार्केटिंग कसे असते हे यामधून दाखवून दिलं आहे. फ्लिपकार्टने रस्त्यावर धन्सू होर्डिंग लावले फ्लिपकार्टच्या सेवांचा प्रचार करण्यासाठी त्यांनी एक विशेष जाहिरात होर्डिंग लावली. त्यामध्ये फ्लिपकार्टने जे लिहिलं होतं ते त्यांनी फारच हुशारीनं लिहिलं होतं. त्यामुळे त्यावरील संदेश आता व्हायरल होतोय.

संबंधित बातम्या

यासाठी तुम्हाला हा फोटो पाहावा लागेल. मगच तुम्हाला त्याचा नेमका अर्थ समजेल. या फोटोत तुम्ही पाहू शकता की अनेक होर्डिंग्स लावले गेले आहे. या होर्डिंग्सवर वेगवेगळ्या गोष्टी आणि इलेक्ट्रॉनिक्सची माहिती दिली आहे. हे सगळे प्रोडक्ट बाजारात विक्रिसाठी उपलब्ध आहेत अशाच अर्थाच्या त्या जाहिराती होता. पण यासगळ्या फ्लिपकार्टने होर्डिंग्सवर लिहिलं होतं की, “आमच्या आजूबाजूला 7 जाहिराती आहेत. प्रत्येक जाहिरातीत जे दिसतंय, ते सर्व फ्लिपकार्टवर मिळतं.” होर्डिंग्सवर लिहिलेला हा संदेश प्रत्येकाचं लक्ष आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक युजर्सने कंपनीच्या या क्रिएटिवीटीचं कौतुक केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या