JOIN US
मराठी बातम्या / Viral / आश्चर्य! आकाशातून जमिनीवर टपटप पडले मासे; इथं चक्क माशांचा पाऊस, पण कसा?

आश्चर्य! आकाशातून जमिनीवर टपटप पडले मासे; इथं चक्क माशांचा पाऊस, पण कसा?

माशांचा पाऊस पडल्यानंतर जमिनीवर मासेच मासे झाल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

जाहिरात

माशांचा पाऊस

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कॅनबेरा, 23 फेब्रुवारी : पाऊस म्हणजे आकाशातून जमिनीवर पडणारे पाण्याचे थेंब. पण तुम्ही कधी माशांचा पाऊस पडताना पाहिलं आहे का? तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल किंवा तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल अशी ही विचित्र घटना प्रत्यक्षा घडली आहे. आकाशातून पाण्याचे थेंब पडावेत तसे मासे जमिनीवर पडत आहे. रस्त्यावर सर्वत्र मासेच मासे दिसत आहेत. या घटनेचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ऑस्ट्रेलियाच्या उत्तर भागातील लाजमानूमधील ही घटना आहे. इथं मंगळवारी वादळ आलं, त्यासोबत पाऊस पण या पावसासोबत मासेही होते. म्हणजे फक्त पाण्याचा नव्हे तर माशांच पाऊस पडू लागला. आश्चर्य म्हणजे हे मासे जिवंतही होते. त्यामुळे सर्वजण हैराण झाले. लोकांनी या माशांना भांड्यात भरून घरी नेलं. लहान मुलं या माशांसोबत खेळू लागले. हा माणूस जिथं जायचा तिथं पडायचा पाऊस; अजूनही उलगडलं नाही या ‘रेन मॅन’चं रहस्य

या घटनेबाबत माहिती देताना सेंट्रल डेजर्ट काऊन्सलर अँड्र्यू जॉनसन जापानंग्का यांनी सांगितलं, शहरात एक मोठं वादळ आलं. लोकांना मुसळधार पावसाची शक्यता वाटत होती. पण काही क्षणात माशांचा पाऊस पाहून सर्वजण हैराण झाले. तर क्विसलँड म्युझियम इचिथोलॉजिस्ट जेफ जॉनसन यांनी हे मासे स्पँगल्ड पर्च प्रजातीचे असल्याचं सांगितलं.

" height=“550”>

स्थानिक लोक याला देवाचा आशीर्वाद समजत आहे. मात्र हवामान तज्ज्ञांनी सांगितलं की, जेव्हा जोरदार वादळ येतं, तेव्हा नदीच्या पाण्यासह मासेही या वादळात खेचले जातात. हे मासे पावसासह कित्येक किलोमीटर दूरपर्यंत फेकले जातात.

अद्भुत! डोंगरावरून वाहतोय चक्क आगीचा धबधबा; तुम्ही हा VIDEO पाहिला का?

लाजमानू अशी घटना पहिल्यांदा घडली नाही. 2010 सालीसुद्धा असंच घडलं होतं. त्यानंतर 2020 साली योवाह शहरातही असा माशांचा पाऊस झाला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या