JOIN US
मराठी बातम्या / Viral / म्हातारपणी समोर आलं 'बचपन का प्यार'; पहिल्या प्रेमाला पाहताच 60 वर्षांच्या आजोबांनी काय केलं एकदा VIDEO पाहाच

म्हातारपणी समोर आलं 'बचपन का प्यार'; पहिल्या प्रेमाला पाहताच 60 वर्षांच्या आजोबांनी काय केलं एकदा VIDEO पाहाच

शाळेतील पहिलं प्रेम दिसताच आजोबांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. उत्साहात त्यांनी जे केलं ते थक्क करणारं आहे.

जाहिरात

वृद्ध कपलचा व्हिडीओ व्हायरल (फोटो - टिकटॉक)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वॉशिंग्टन, 05 जुलै : बचपन का प्यार… हे गाणं तर तुम्ही ऐकलंच असेल. यावेळी अनेकांना आपल्या लहापणीच्या प्रेमाची आठवण झाली असेल. शाळेतील पहिलं प्रेम… ते अचानक तुमच्या समोर आलं तर तुमचं काय होईल?…  एक 60 वर्षांचे आजोबा ज्यांच्यासमोर इतक्या वर्षाने अचानक त्यांचं पहिलं प्रेम समोर आलं. म्हातारपणात बचपन का प्यार दिसताच, आजोबांच्या आनंदाला पारावर उरला नाही. त्यानंतर त्यांनी जे केलं, ते थक्क करणारं आहे. वृद्ध कपलचा हा रोमँटिक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. असं म्हणतात, माणूस आपलं पहिलं प्रेम कधीच विसरत नाही. असं प्रेम अचानक समोर आलं तर साहजिकच त्यामुळे होणारा आनंद शब्दात व्यक्त करण्यासारखा नाही. अमेरिकेतील या 60 वर्षांच्या व्यक्तीसोबतही तेच घडलं. थॉमस असं त्याचं नाव.  हायस्कूलमध्ये असताना नॅन्सी नावाच्या मुलीच्या ते प्रेमात पडले. पण त्यानंतर काही कारणामुळे ते एकमेकांपासून वेगळे झाले. आता इतक्या वर्षांनी ते दोघंही पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आले. सुरुवातीला ते फोनवर बोलू लागले. अखेर दोघांनी एकमेकांना प्रत्यक्ष भेटायचं ठरवलं.

नॅन्सीने फ्लोरिडासाठी फ्लाईट पकडली. तिला थॉमसला फक्त पाहायचं होतं. पण तिथं थॉमस तिला मोठं सरप्राईझ देणार आहे, याची कल्पनाही तिला नव्हती. तो विमानतळावर तिची आतुरतेने वाट पाहत होता. जशी नॅन्सी विमानतळावर आली तसं थॉमसला पाहून तिला रडू कोसळलं. नंतर थॉमस गुडघ्यावर बसला. थॉमसने तिला पुष्पगुच्छ आणि अंगठी देऊन प्रपोज केलं. चक्क लग्नासाठी मागणी घातली. 35वं वरीस धोक्याचं! वयाची पस्तीशी गाठताच नरक होतं आयुष्य; कारण आहे एक ‘शाप’ थॉमस म्हणाला, “माझ्या प्रिय नॅन्सी, आपल्याला पहिल्यांदा भेटून 60 वर्षे झाली आहेत. आपण पहिल्यांदा डेटला गेलो त्याला 56 वर्षे झाली, मी तुला शेवटचं पाहिलं  त्याला 10 वर्षे झाली आणि आता पुन्हा आपला संपर्क झाला त्याला 20 दिवस झाले. तुझ्या चीअरलीडरच्या दिवसांपासून मला तुझ्यावर नेहमीच प्रेम आहे. तुला पाहून माझ्या चेहऱ्यावर हसू येते, माझ्या हृदयाची धडधड वाढते. गेल्या तीन आठवड्यांपासून मी दिवसाच्या प्रत्येक तासाला तुझा विचार केला आहे आणि रोज रात्री तुझ्याशी तासनतास बोललो आहे. मी तुला पुन्हा भेटण्यास उत्सुक आहे, तुला माझ्या मिठीत धरलं आहे आणि तुला माझ्यासाठी किती अनमोल आहे आहे हे सांगण्यास मी उत्सुक आहे. शेवटी ती स्वप्ने सत्यात उतरताना पाहून मला खूप आनंद होत आहे” नर्ससोबत रोमान्स रुग्णाच्या जीवावर बेतला; शारीरिक संबंध ठेवताना असं काही घडलं की झाला मृत्यू थॉमस पुढे म्हणाला, “मला आजपर्यंत भेटलेली सर्वात खास व्यक्ती तू आहेस. तुझं सौंदर्य मला आतून बाहेरून मोहित करतं. तुझी करुणा, दयाळूपणा नेहमीच माझ्या हृदयाला स्पर्श करतं. तू मला असं बदललं आहेस की शब्दात सांगणं सोपं नाही. जेव्हापासून मी तुझ्याशी बोलत आहे, मी फक्त हसत आहे. जोडीदार, प्रियकर आणि मित्रामध्ये मला हवं असलेलं सर्वकाही तू आहेस. तर नॅन्सी मी नम्रपणे तुमच्याकडे आज, 30 जून रोजी एक प्रस्ताव घेऊन येत आहे. मला माझे उर्वरित आयुष्य तुझ्याबरोबर घालवायचं आहे आणि आम्ही एकत्र घालवलेल्या प्रत्येक क्षणाची कदर करायची आहे. आपण प्रत्येक दिवस रोमांचक करू. मला तुझ्याबरोबर म्हातारं व्हायचं आहे. रोज सकाळी तुझ्या मिठीत उठायचं आहे, माझी स्वप्ने आणि आकांक्षा सामायिक करायचं आहे, हसायचं आहे आणि रडायचं आहे. चांगल्या आणि वाईट काळात एकमेकांना साथ द्यायची आहे”

हे पाहून नॅन्सी अधिकच थक्क झाली. तिच्या डोळ्यातील अश्रू काही थांबेना. विमानतळावरही प्रत्येक जण थांबून हा रोमान्स पाहत होता. तेसुद्धा भावुक झाले. हा हृदयस्पर्शी क्षण डॉ. थॉमस यांच्या एका रुग्णाने रेकॉर्ड करून टिकटॉकवर अपलोड केला. काही वेळातच तो व्हायरल झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या