प्रतीकात्मक फोटो - Canva
नवी दिल्ली, 23 जुलै : चोरीची आजवर बरीच प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. पण आता एका घरात अशी चोरी झाली की तुम्ही विचारही केला नसेल. चोर चोरी करायला आले पण असं काही करून गेलं की घरमालकही थक्क झाला. चोरट्यांनी चोरी केली नाहीच, पण घरात घुसून जे केलं त्यावर मालकाचा विश्वासच बसत नव्हता. दिल्लीतील हे अजब चोरीचं प्रकरण आहे. दिल्लीतील एका सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या घरात चोर घुसले. यावेळी इंजिनीअर घरात नव्हता. जेव्हा तो घरी परत आला तेव्हा समोरच्या दरवाजाचं कुलूप तुटलेलं दिसलं. तो घरात गेला. पण घरातील कोणतीच गोष्ट चोरीला गेली नव्हती. अगदी सर्व होतं तसंच्या तसं जागेवर होतं. पोलिसांनी सांगितलं की सेक्टर 8, रोहिणी इथल्या घरी चोरी झाल्याची तक्रार मिळाली. 80 वर्षीय तक्रारदाराकडून पोलिसांनी अधिका माहिती घेतली. त्यांनी सांगितलं की ते 19 जुलै सकाळी 8 वाजताच्या सुमारास पत्नीसह गुडगाव येथे राहणाऱ्या आपल्या मुलाला भेटण्यासाठी गेला होते. शुक्रवारी सकाळी त्यांच्या शेजाऱ्यांचा त्यांना फोन आला. त्यांनी घराच्या दरवाजाचं कुलूप तुटलेलं असल्याचं सांगितलं. तसेच आम्ही लगेच घरी आलो. आणखी एक सीमा, फेसबूक फ्रेंडला भेटायला अंजूने ओलांडली बॉर्डर, पाकिस्तानमध्ये पोहोचली घऱाच्या मुख्य दरवाजाचं टाळं तुटलेलं होतं. पण घरात महागड्या वस्तू न ठेवल्याने काहीही चोरीला गेलं नाही. कपाटे, अलमारी सर्व काही नीट होतं. पण घराच्या दारात त्यांना 500 रुपयांची नोट सापडली. कदाचित चोरांना या घरात चोरी करण्यासारखं काहीही सापडलं नाही. त्यामुळे त्या घरातून निघताना त्यांनी दारात 500 रुपयांची नोट सोडली असावी. 264 रुपयांना खरेदी केली फुलदाणी, आता 10 लाखांची लागलीय बोली, हातात सहज मावते, पाहा PHOTO चोरीची ही पहिली अशी अजब घटना नाही. याआधीही शाहदरा येथील फरश बाजार भागातही असंच घडलं होतं. दोन चोरट्यांनी बंदुकीच्या जोरावर एका जोडप्याला लुटण्याचा प्रयत्न केला. पण ते त्यांना 100 रुपयांची नोट देऊन त्यांना कोणतीही हानी न करता पळून गेलं. चोरांनी असं केलं कारण त्या जोडप्याकडे फक्त 20 रुपये होते.