ब्रिटनमधील सरे शहरातील चॅरिटी शॉपमध्ये ही फुलदाणी केवळ 2.5 पौंड (264 रुपये) मध्ये विकली गेली होती. त्यावर जपानी शैलीतील कलाकृती आहेत.
या लहान फुलदाणीचा आकार अवघा 10 सें.मी. इतका आहे. आम्ही पाहताक्षणी याच्या प्रेमात पडलो, म्हणून लगेच खरेदी केली, अशी माहिती मालक करेन यांनी दिली.
या छोट्या फुलदाणीवर उडणारे पक्षी, कोंबड्या, पिल्ले, कोंबडा, फुले आणि पाने यांचा समावेश असलेली सुंदर चित्रे काढली आहेत. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, गॅलरीच्या सह-संचालक क्लियोना किलरॉय यांनी सांगितले की, या वस्तूला खूप मागणी आहे.
फुलदाणीवर सजावटीच्या रंगांनी सुंदर आकार तयार केले आहेत, जे विशिष्ट कलाकार स्वतःच्या शैलीने बनवू शकतात. 29-30 जुलै रोजी ऑनलाइन वीकेंड सेलमध्ये फुलदाणी लिलावासाठी ठेवली जाणार आहे.
फुलदाणीच्या तळाशी एक चिन्ह आहे. क्वचितच लोक त्याकडे लक्ष देत असतील. पण हेच फुलदाणीला अद्वितीय बनवते. कँटरबरी ऑक्शन गॅलरीजमधील तज्ञांनी हे मेजी कालखंडातील जपानमधील सर्वात प्रसिद्ध कलाकार नामिकावा यासुयुकी यांची कलाकृती असल्याचे सांगितले आहे.