मुंबई 14 मार्च : रस्त्यावरून चालताना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते, नाहीतर काय होईल ते कोणीच सांगू शकत नाही. तुम्ही पायी चालत असाल किंवा कारने जात असाल तरी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. विशेषत: तुम्ही बाईकवर असाल तर अधिक काळजी घेण्याची गरज असते. तुम्ही पाहिलं असेल की अनेकदा लोक हेल्मेटशिवाय रस्त्यावर फिरतात आणि इतक्या वेगाने दुचाकी चालवतात की जणू त्यांना त्यांच्या जीवाची पर्वा नाही. तर अनेकदा आपल्याला पाहायला मिळतं, की अगदी छोट्या छोट्या कारणांवरुन लोक रस्त्यावरच गोंधळ घालायला सुरुवात करतात. पहिल्यांदा कारला धडक, नंतर चर्चच्या गेटला; भरधाव बसच्या अपघाताचा धक्कादायक Video सोशल मीडियावर सध्या एक असाच व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून सगळेच शॉक झाले. यात दिसतं, की काहीतरी कारणावरुन दोन दुचाकीस्वार रस्त्यावरच आपसात भिडतात. यातील एक व्यक्ती इतका भडकतो, की तो रस्त्याच्या बाजूला पडलेला एक मोठा दगड उचलतो आणि दुचाकीस्वाराला फेकून मारतो. हा दगड सरळ जाऊन दुचाकीस्वाराच्या चेहऱ्यावर लागतो. सुदैवाने या व्यक्तीने हेल्मेट घातलं असल्यानं त्याला मार लागत नाही. अन्यथा त्याची काय अवस्था झाली असती, हे तुम्हाला व्हि़डिओ पाहून कळेलच.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की कशाप्रकारे हे दोघं आपसात भिडले आहेत. एक आपल्या बाईकवरुनच दुसऱ्याला मारण्याचा प्रयत्न करत आहे. तर, दुसरा व्यक्ती दगड उचलून त्याच्या डोक्यात टाकतो. यानंतर रस्त्यावरच हाय व्होलटेज ड्रामा सुरू होतो. दुचाकीस्वार दगड उचलून त्या व्यक्तीच्या मागे धावू लागतो. या हाय व्होलटेड ड्राम्याचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @gharkekaleshh नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे.
अवघ्या 10 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 2 लाख 52 हजारहून अधिकवेळा पाहिला गेला आहे. तर हजारो लोकांनी लाईक केला आहे. लोक यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत. यावर कमेंट करत एकाने म्हटलं, की हेल्मेट फक्त अपघातातूनच नाही, तर अशा लोकांपासूनही आपला बचाव करतं. आणखी एकाने म्हटलं, की यासाठीच हेल्मेट गरजेचं आहे, असं म्हटलं जातं.