नवी दिल्ली, 13 मार्च : रस्त्यावर होणाऱ्या अपघातांच्या प्रमाणात वाढ होत आहे. रस्त्यावरील भरधाव गाड्यांमुळे भीषण अपघात घडतायेत. दिवसेंदिवस याची संख्या वाढत असून अनेक भयानक दृश्य पहायला मिळतात. अपघाताचे अनेक भयानक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर समोर येत असतात. अशातच आणखी एका अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे.
अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर समोर आली आहे. ज्यामध्ये वळणावर अचानक समोरून आलेल्या कारला एक हायस्पीड बस धडकताना दिसली. यादरम्यान अपघात इतका वेगवान होता की बसला धडकल्यानंतर कारचा चक्काचूर झाला. त्याचवेळी भरधाव वेगामुळे बस पुढे जात असताना चर्चच्या गेटलाही धडकली. सध्या ANI या वृत्तसंस्थेच्या ट्विटर अकाउंटवरून या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे.
#WATCH | Kerala: A Kerala State Road Transport Corporation bus met with an accident after colliding with a car near Kizhavallor in Pathanamthitta district. Thereafter, the bus rammed into the wall of a church. Injured passengers were rushed to hospital. pic.twitter.com/SiFjOvDLsR
— ANI (@ANI) March 11, 2023
ही घटना केरळमधील पथनमथिट्टा जिल्ह्यातील किझावल्लोरजवळ घडल्याचे सांगण्यात येत आहे. जिथे केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस समोरून येणाऱ्या कारला धडकली. त्यानंतर अपघातग्रस्त बस एका चर्चच्या भिंतीला धडकली. व्हिडिओमध्ये गेट तुटून बसच्याच वर पडताना दिसत आहे. या अपघातात बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. ज्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या या अपघाताचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे पाहून युजर्स कमेंट करताना जास्त वेगाने गाडी चालवण्यापासून दूर राहण्याचा सल्ला देताना दिसत आहेत.
दरम्यान, व्हिडीओ व्हायरल होताच व्हिडीओवर अनेक कमेंट देखील येताना दिसत आहे. रस्त्यावर चालताना किंवा गाडी चालवताना कायम सावधान राहणं गरजेचं असतं. अन्यथा असे अपघात घडू शकतात. आत्तापर्यंत असे अनेक भीषण अपघात मोठ्या प्रमाणात घडले असून याचे सीसीटीव्ही फूटेजदेखील सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident, Shocking viral video, Social media viral, Top trending, Videos viral, Viral