सिंहिणीसाठी भिडले 2 सिंह
नवी दिल्ली 15 जुलै : सिंहाला जंगलाचा राजा म्हटलं जातं सिंह पराक्रमी, बलवान, उत्साही आणि खूप शक्तिशाली असतात. जंगलातील बाकीचे प्राणी सिंहाला पाहून आपला मार्ग बदलतात. कारण एखादा प्राणी सिंहाच्या तावडीत सापडला तर मग त्याची सुटका जवळपास अशक्य होऊन जाते. तुम्ही अनेक वेळा सिंहाला इतर प्राण्यांची शिकार करताना पाहिलं असेल, पण तुम्ही कधी सिंहाला सिंहाशी लढताना पाहिलं आहे का आणि तेही सिंहिणीला मिळवण्यासाठी? असं दृश्य तुम्ही क्वचितच पाहिलं असेल. मात्र आता अशाच घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ‘लॉयन फाइट’ नावाच्या अकाऊंटवरून दोन सिंहांच्या लढाईचा हा व्हिडिओ यूट्यूबवर पोस्ट करण्यात आला आहे. केवळ एका सिंहिणीला मिळवण्यासाठी हे दोन्ही सिंह एकमेकांसोबत भिडले असल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. सिंहाला सिंहिणीशेजारी बसलेलं पाहून दुसरा सिंह संतापला आणि धावत जाऊन त्याच्यावर हल्ला केला. यादरम्यान सिंहीण तिथून पळताना दिसली. दोन्ही सिंहांची गर्जना आणि झुंज एवढी जबरदस्त होती की सिंहिणीलाही मैदान सोडून पळावं लागलं.
दोन्ही सिंहांनी एकमेकांना पंजे आणि तीक्ष्ण दातांनी अनेक जखमा केल्या. या लढाईत एक सिंह कमकुवत असल्याचं दिसलं. या भांडणात तो इतका गंभीर जखमी झाला की त्याच्या तोंडातून रक्त येऊ लागलं. तर दुसऱ्या सिंहाने लढत जिंकली. याच क्लिपमध्ये आणखी एक व्हिडिओ आहे, ज्यामध्ये दोन सिंह पुन्हा एकमेकांशी लढताना दिसत आहेत. यादरम्यान तिथे अनेक सिंहीणही उपस्थित होत्या ज्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या सिंहांना लढण्यापासून रोखू शकल्या नाही. हा प्राणी समोर येताच सिंहिणीनी ठोकली धूम; जीव वाचवत पळाली, पाहा मजेशीर VIDEO या व्हिडिओच्या शेवटी एक सिंह गंभीर जखमी अवस्थेत दिसला. तर दुसरा सिंह आपल्या सिंहीणीसोबत एकांतात गर्जना करू लागल्याचं दिसलं.