JOIN US
मराठी बातम्या / Viral / आपल्या मृत्यूची साक्ष देण्यासाठी 'मृत महिला' पोलिस स्टोशनमध्ये, नक्की के प्रकरण तरी काय?

आपल्या मृत्यूची साक्ष देण्यासाठी 'मृत महिला' पोलिस स्टोशनमध्ये, नक्की के प्रकरण तरी काय?

मुंबई : मध्य प्रदेशातून एक अजब-गजब घटना समोर आली, ज्याबद्दल ऐकून सर्वच लोक चक्रावले आहे. हे प्रकरण इतकं गुंतागुंतीचं आहे की नक्की काय सुरु आहे, हे घरच्यांना देखील कळलं नाही. या प्रकरणात एक मृत महिला स्वत: चालत पोलिस स्टेशनमध्ये आली आणि तिने आपला भाव आणि वडिलांबद्दल पोलिसात आपलं स्टेटमेंट नोंदवलं. आता हे ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल की हे कसं शक्य झालं? एक मेलेली महिला कशी काय जिवंत होऊ शकते? तर यामागे पोलिसांची खूप मोठी चुक आहे.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : मध्य प्रदेशातून एक अजब-गजब घटना समोर आली, ज्याबद्दल ऐकून सर्वच लोक चक्रावले आहे. हे प्रकरण इतकं गुंतागुंतीचं आहे की नक्की काय सुरु आहे, हे घरच्यांना देखील कळलं नाही. या प्रकरणात एक मृत महिला स्वत: चालत पोलिस स्टेशनमध्ये आली आणि तिने आपला भाव आणि वडिलांबद्दल पोलिसात आपलं स्टेटमेंट नोंदवलं. आता हे ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल की हे कसं शक्य झालं? एक मेलेली महिला कशी काय जिवंत होऊ शकते? तर यामागे पोलिसांची खूप मोठी चुक आहे. भारतातील रहस्यमय दरवाजा, जो उघडला तर प्रत्येक भारतीय होईल श्रीमंत खरंतर पोलिसांनी मुलीच्या हत्येप्रकरणी पुराव्यांसह वडिलांना आणि भावाला अटक केली आणि गुन्हा दाखल करत तुरुंगात ठेवलं, अखेर नऊ वर्षानंतर या घटनेबद्दल त्या मुलीने येऊन वक्तव्य केलं, ज्यामध्ये तिचा भाऊ आणि वडिल तुरुंगात होते. मुलगी जिवंत घरी परतल्यानंतर पोलिसांच्या कारवाईवर आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. असे कसे झाले की, जो सांगाडा पोलिसांनी पीडितेचा असल्याचे सांगितले होते, ती अखेर जिवंत परत आली. आता मुलीचे वडील आणि भावाने खोट्या गुन्ह्या अंतर्गत तुरुंगाची शिक्षा भोगली याची जबाबदारी कोणाची? अशे प्रश्न उपस्थीत केले जात आहेत. ही घटना मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथील सिंगोडी येथील आहे. कांचन उईके असे पोलीस रेकॉर्डमध्ये मृत असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र आता कांचन आपल्या घरी परत आली आहे, तिचे लग्न झाले आहे आणि तिला दोन मुलं देखील आहेत. कृपया सांगा की 13 जून 2014 रोजी कांचन उईके छिंदवाडा येथील घरातून बेपत्ता झाली होती. यानंतर कुटुंबीयांनी कांचनचा शोध सुरू केला, पण ती सापडली नाही, तेव्हा ती बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तिचा तपास सुरू केला. दोन वर्षांपूर्वी पोलिसांना कांचनच्या घराजवळ एक सांगाडा सापडला होता. यानंतर पोलिसांनी कांचनला तिचे वडील आणि भावाने मारून तिचा मृतदेह जवळच्या शेतात पुरल्याचे सिद्ध झाले. पोलिसांनी मिळालेला सांगाडा हा कांचनचाच असल्याचे पोलिसांनी सिद्ध केले, तसेच बळजबरीनं कांचनच्या भावानेच तिला मारलं, याची कबुली देखील घेतली. गुन्हा सिद्ध झाल्यानंतर त्याला तुरुंगात ठेवण्यात आले.

या सगळ्या काळात कांचनने घरातून पळून जाऊन आपल्या आवडीच्या व्यक्तीशी लग्न केलं, आपला संसार चांगला सुरु असताना, अचानक कांचनला एका व्यक्तीने तिच्या भावासोबत आणि वडिलांसोबत घडलेला किस्सा सांगितला. ज्यानंतर कांचन अखेर आपल्या घरी परतली आणि तिने आपले वडिल आणि भावाला सोडवण्यासाठी स्टेटमेंट दिलं. कांचन समोर आल्यानंतर आता पोलिसांच्या तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. कारण पोलिसांनी जो सांगाडा कांचनचा असल्याचे सांगितले होते, त्याचा डीएनए अहवाल अद्याप सादर झालेला नाही. आता या प्रकरणात पुढे काय होईल, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या