JOIN US
मराठी बातम्या / Viral / 90 टक्के माती, 10 टक्के सिमेंट; 6000 झाडांचं असं उभारलं आलिशान घर!

90 टक्के माती, 10 टक्के सिमेंट; 6000 झाडांचं असं उभारलं आलिशान घर!

‘त्यांनी’ आपल्या घरात 1 नाही, 100 नाही, तर तब्बल 6000 झाडं लावली आहेत. यामध्ये 150 प्रकारच्या विविध रोपांचा समावेश आहे.

जाहिरात

तिथलं नैसर्गिक सौंदर्य पाहून 'त्यांनी' असं घर बांधायचं ठरवलं.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

तारा ठाकूर, प्रतिनिधी पंचकुला, 29 जून : अनेकजणांना बागेत झाडांच्या सहवासात वेळ घालवायला आवडतं, त्यामुळे अनेक घरांच्या खिडक्यांमध्ये विविध फुलझाडं, फळझाडं पाहायला मिळतात. तर, काही घरांच्या अवतीभोवतीही गर्द झाडी असते. विशेष म्हणजे काहीजण आपलं घरच बागेसारखं सजवतात. घरात विविध झाडांचं संगोपन करायला त्यांना आवडतं. अशीच आवड हरियाणाच्या पंचकुला जिल्ह्यातील रहिवासी मनीषा गुप्ता यांनी जोपासली आहे. त्यांनी आपल्या घरात 1 नाही, 100 नाही, तर तब्बल 6000 झाडं लावली आहेत. यामध्ये 150 प्रकारच्या विविध रोपांचा समावेश आहे. खरंतर मनीषा यांचं पूर्ण घरच अतिशय आकर्षक आहे. पूर्वी आपल्या गावी मातीच्या जमिनीची घरं असायची, तसंच त्यांचं घर आहे. तिथेच त्यांनी झाडांचं संगोपन केलंय. त्यांनी घरातच अशी एक पाण्याची टाकी बसवलीये की, ज्यात पावसाचं पाणी जमा होतं. हे पाणी त्या वर्षभर वापरतात. शिवाय या घरात कायम गारवा असतो. अतिशय संशोधनपूर्ण बांधकाम असलेलं हे घर तिथे येणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरतं. महत्त्वाचं म्हणजे घरात 6000 सुदृढ झाडं असणं हीच मोठी वैशिष्ट्याची बाब आहे. एखादं सर्वसाधारण घर बांधण्यासाठी जितका खर्च येतो, तितकाच खर्च या घराच्या बांधकामासाठी आला, असं मनीषा सांगतात.

मनीषा ज्यावेळी पंचकुलामध्ये राहायला गेल्या, तेव्हा तिथलं नैसर्गिक सौंदर्य पाहून त्यांनी असं घर बांधायचं ठरवलं की ज्यामध्ये त्यांच्या पुढील पिढ्यादेखील निरोगी आयुष्य जगतील. त्यांनी सांगितलं, भविष्यात हे घर पाडलं जरी, तरी पर्यावरणाचं कोणतंही नुकसान होणार नाही. कारण संपूर्ण घराच्या बांधकामात 90 टक्के माती आणि केवळ 10 टक्के सिमेंटचा वापर झालेला आहे. Sangli News : महाराष्ट्रात आहे ‘बुलेटचं गाव’, पाहा कसं पडलं नाव?, PHOTOS दरम्यान, घरात झाड असणं हे घरातील व्यक्तींच्या निरोगी आयुष्याचं प्रतीक असतं. झाडं आपल्याला शुद्ध हवा देतात. परिणामी, आपली प्रकृती उत्तम आणि घरातील वातावरण प्रसन्न राहतं. त्यामुळे प्रत्येकाने घरात किमान एक तरी झाड लावायलाच हवं, शिवाय त्याचं छान संगोपनही करायला हवं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या