हत्ती आणि बिबट्याचा व्हिडीओ.
मुंबई, 14 एप्रिल : आपल्या मार्गात कोण आडवा आला तर अनेकांना राग येतो. अगदी प्राणी ही याला अपवाद नाही. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. हत्ती आणि बिबट्याचा हा व्हिडीओ आहे. हत्ती रस्त्याने जात असताना एक बिबट्या अचानक त्यांच्या रस्त्यात आडवा आला. त्यानंतर हत्तीला इतका राग आला की त्याने बिबट्याची अक्षरशः वाट लावली आहे. हत्ती आणि बिबट्याच्या या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एक बिबट्या शिकारीसाठी दबा धरून बसला होता. तिथूनच हत्तींचा कळप जात होता. आपल्याला धोका आहे, याची कल्पना हत्तींना दूरूनच आली. तेव्हा एक हत्ती सर्वात पुढे आला. त्याने पाहिलं तर त्यांच्या मार्गात एक बिबट्या होता.
हत्तीला बिबट्याला पाहून राग आला आणि तो धावत त्याच्या दिशेने आला. चिडलेल्या हत्तीला पाहून बिबट्याचीही हवा टाईट झाली. त्यानेही धूम ठोकली. घशात मासा अकडलेल्या पक्ष्याला वाचवण्यासाठी व्यक्तीची धडपड; पण चोचीत हात टाकताच…; Shocking Video व्हिडीओत तुम्ही पाहू शकता बिबट्या झुडुंपामध्ये दिसतो आहे. तितक्यात तिथं एक हत्ती येतो. बिबट्याला पाहताच हत्ती त्याच्या मागे धावत सुटतो. बिबट्याही घाबरून झाडांमध्ये पळ काढतो. पण तरी हत्ती काही त्याची पाठ सोडत नाही. तोसुद्धा बिबट्याच्या मागे त्या झाडांमध्ये घुसतो. थोड्या वेळाने तिथून हत्तींचा कळप जाताना दिसतो. एकंदर हत्ती आपल्या कळपाचं संरक्षण करण्यासाठी पुढे आला आणि आपल्या कुटुंबाच्या मार्गात असलेल्या धोक्याला त्याने पळवून लावलेलं दिसतं. व्हिडीओच्या शेवटी बिबट्या एका ठिकाणी गुपचूप बसलेला दिसतो आहे. या क्युट पक्ष्यांना स्पर्श करताच होऊ शकतो तुमचा मृत्यू; चुकूनही जवळ जाऊ नका Maasai Sightings या युट्यूब अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
बिबट्या हा जंगलातील सर्वात धोकादायक शिकारी मानला जातो. समोर एखादा प्राणी आला तर पळून जाणे अवघड होते. पण हा भयंकर शिकारीसुद्धा हत्ती किंवा वाघासमोर जाणं टाळतो.