प्रयागराज, 5 जून : मिशी म्हणजे मर्दानगी! अशी अनेकांची समज असते. त्यामुळे लोक भल्या मोठ्या मिश्या वाढवतात. काहीजण छोटुशी ठेवतात, पण मिशी हवीचं, असा आग्रह धरतात. काहीजण मात्र मिशीबिशी काही नसतं, आपल्या चेहऱ्यावरचे केस असतात फक्त, असं मानून हवी तशी ठेवतात किंवा ठेवत पण नाहीत. म्हणजेच मिशीबद्दल तऱ्हेतऱ्हेच्या स्टाईल असतात. पण तुम्ही कधी मिशीच्या केसांना नाचताना पाहिलंय का? असं खरोखर घडलंय आणि त्याची नोंद जागतिक विक्रमात झाली आहे. उत्तर प्रदेशच्या प्रयागराजचे रहिवासी ‘दुकानजी’ यांनी हा विक्रम करून दाखवलाय. त्यांची मिशी चक्क मेणबत्ती घेऊन नाचते. प्रयागराजच्या दारगंजचे रहिवासी दुकानजी यांचं खरं नाव राजेंद्र तिवारी असं आहे. त्यांचा रंगीबेरंगी लूक आणि स्कुटरवरील आकर्षक डिझाईन नेहमीच चर्चेचा विषय असतात. परंतु त्याहीपेक्षा चर्चा होते ती त्यांच्या मिशांची. ते आपल्या मिशांना मेणबत्ती लावून नृत्य करतात. यावेळी त्यांचं शरीर पूर्णपणे स्थिर असतं आणि केवळ मिश्या हलतात. आपल्या मिश्यांची चमक त्यांनी ‘इंडियाज गॉट टॅलेण्ट’मध्येही दाखवली होती. त्यावेळी परीक्षकांच्या खुर्चीवर बसलेली शिल्पा शेट्टी आश्चर्यचकित झाली होती. शिवाय किरण खेर, मनोज मंतशीर आणि बादशहानेही या मिश्या बघून आ वासला होता. https://youtu.be/PxjVyBLqTGI राजेंद्र तिवारी यांना आपल्या या कलेमुळे अनेक आंतरराष्ट्रीय पारितोषिके मिळाली आहेत. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डवर त्यांनी आपलं नाव कोरलं आहे. Jalna News : वयाच्या 68 व्या वर्षीही तरुणाईला लाजवेल अशी बॉडी, पाहा काय आहे फिटनेसचे रहस्य खरंतर केस किंवा मिश्या वाढवणे म्हणजे त्यांची विशेष काळजीही घ्यावी लागते. त्यांना वेळच्या वेळी धुवावं आणि विंचरावं लागतं. राजेंद्र तिवारी हे आपल्या मिश्या नुसत्या स्वच्छच ठेवत नाहीत तर त्यांच्या योग्य वापर करून कलाही सादर करतात. हीच बाब लक्षात घेऊन त्यांना प्रयागराजमध्ये स्वच्छता अँबेसिडर बनवण्यात आलं आहे. शिवाय ते विविध सामाजिक उपक्रमांमध्येही सहभागी असतात.