JOIN US
मराठी बातम्या / Viral / Video : दारूच्या नशेत सापाला Kiss, कोब्रासोबत खेळण्याचा परिणाम थरकाप उडवणारा

Video : दारूच्या नशेत सापाला Kiss, कोब्रासोबत खेळण्याचा परिणाम थरकाप उडवणारा

हा व्हिडीओ बिहारच्या नवादा येथील असल्याचे सांगितले जात आहे. यामधील व्यक्ती सापाशी खेळताना दिसत आहे.

जाहिरात

व्हायरल व्हिडीओ

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : सोशल मीडियावर प्राणांशी संबंधीत अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. लोकांना असे व्हिडीओ पाहायला आवडतात. हे व्हिडीओ कधी मनोरंजक असतात तर काही व्हिडीओ हे थरारक असतात. यामध्ये सापांशी संबंध देखील तुम्ही अनेक व्हिडीओ पाहिले असतील. पण सध्या समोर आलेला व्हिडीओ हा थोडा वेगळा आहे. सापाचं नुसतं नाव जरी घेतलं तरी काही लोक थरथर कापतात, कारण साप हा खूपच खतरनाक प्राणी आहे. त्याने जर एकदा का दंश केला की माणसाचं काही खरं नाही. अनेक वेळा सापाचं विष इतकं खतरनाक असतं की ते काही सेकंदातच माणसाचा जीव संपवू शकतात. Video : शांत मगरीला असं काही डिवचलं की पुढच्याच क्षणी जिवावर आला सगळा प्रकार पण एका व्यक्तीला मात्र सापाची काहीच भीती नाही. या मद्यधुंद व्यक्तीला काहीच कळत नाहीय की तो नक्की काय करतोय. ही व्यक्ती सापासोबत खेळू लागते, ज्यामुळे अखेर त्या व्यक्तीने प्राण गमावले असल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिडीओ बिहारच्या नवादा येथील असल्याचे सांगितले जात आहे. यामधील व्यक्ती सापाशी खेळताना दिसत आहे. कधी ती व्यक्ती सापाला गळ्यात घालत होती तर कधी त्याला किस करत होती. तर कधी आपल्या खांद्यावर ठेवून नाचवत होती. इतकेच नाही तर ही व्यक्ती सापाला झोपवून त्याच्यासोबत झोपली देखील होती. त्या व्यक्तीला सापाशी असं खेळताना पाहून आजूबाजूच्या लोकांनी त्याचा व्हिडीओ बनवला आणि सोशल मीडियावर टाकला, त्यानंतर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. ही घटना नारायणपूर गावची आहे. शनिवारी या प्रकरणावर पोलिसांनी सांगितले की, या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि त्याचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

दिलीप यादव असे या मृताचे नाव आहे. व्हिडीओमध्ये ती व्यक्ती दारूच्या नशेत असून विषारी सापाशी खेळत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. याचे नाटक पाहून आजूबाजूला मोठी गर्दी झाली. लोकांनी त्याला सापाला सोडून द्यायला सांगितले पण तो काही ऐकला नाही, अखेर त्याचा परिणाम धक्कादायक होता.

सर्पदंशाची घटना घडल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. यानंतर गोविंदपूर पोलिस ठाण्याचे प्रभारी श्याम पांडे यांनी सांगितले की, मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी सदर हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे. ती व्यक्ती दारूच्या नशेत होती, हे शवविच्छेदनानंतरच स्पष्ट होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या