मुंबई : मगरीला तुम्ही टीव्हीत किंवा प्राणीसंग्रालयात नक्कीच पाहिलं असणार. पण असलं असलं तरी तिची सर्वांनाच भिती वाटते. कारण ती जंगलातील सर्वात खरतनाक प्राण्यांपैकी एक आहे. तिच्या तावडीत एकदा का कोणता प्राणी अडकला, तर तो काही वाचत नाही. मगर आपल्या बलवान जबड्यात त्या प्राणीचे अक्षरश: लचके तोडते. त्यामुळे आपण देखील मगरी पासून चार हात लांबच राहातो. पण एका व्यक्तीने मगरीजवळ जाऊन तिला उकसवण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर त्याच्यासोबत जो प्रकार घडला तो खरोखर हृदयाचे ठोके चुकवणारा आहे. सोशल मीडियावर नेहमीच आपल्यासमोर प्राण्यांसंबंधीत व्हिडीओ व्हायरल होत असतात. जे पाहायला लोकांना फार आवडतात. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक महाकाय मगर पाण्याकाठी शांत बसली आहे, तेव्हा तेथे एक व्यक्ती येते आणि ती व्यक्ती मगरीला उठण्याचा प्रयत्न करते. काहीकाळ मगर काहीच रिएक्शन देत नाही, त्यामुळे ही व्यक्ती देखील सतत मगरीला उठवत राहाते. अखेर रागावलेली मगर क्षणाचाही विलंब न करता मागे वळते आणि या व्यक्तीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करते.
नशिबाने ही व्यक्ती त्या मगरीच्या तावडीत आली नाही, ज्यामुळे ती वाचली. पण पुढे या मगरीने काय केलं हे कळू शकलेलं नाही, कारण हा व्हिडीओ तेथेच संपला. मगर ज्या पद्धतीने मागे वळली ते पाहून काही सेकंदासाठी असंच वाटलं की या व्यक्तीचं आता काही खरं नाही. पण तिचा नेम चुकला.
हा व्हिडीओ @africasafariplanet या Instagram आकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर लोकांनी लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. तर याला हजारो व्ह्यूज देखील मिळाले आहेत.

)







