सापाचा क्युट व्हिडीओ (फोटो - इन्स्टाग्राम व्हिडीओ ग्रॅब)
नवी दिल्ली, 28 जुलै: सापाला पाहताच अनेकांना घाम फुटतो. सापा ला पाहून भिती वाटते, अंग थरथर कापू लागतं. सापाचे असे कितीतरी व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील जे पाहून धडकी भरत.े पण सध्या सापाचा असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जो पाहिल्यावर तुम्ही सापाला घाबरणार नाही तर त्याच्या प्रेमातच पडाला. एका क्युट सापाचा व्हिडीओ चर्चेत आला आहे. साप आणि क्युट, वाचतानाच पचनी काही पडत नाही. पण हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल हा साप खरंच क्युट आहे. व्हिडीओत पाहू शकता जमिनीवर एक साप आहे. जो सरपटत जातो आहे. एक व्यक्ती त्या सापाच्या जवळ येते आणि हळूच त्या सापाला स्पर्श करते. ही व्यक्ती फक्त आपलं एक बोट त्या सापाला लावते आणि साप उलटा होऊन जमिनीवर कोसळतो. जणू काही तो मृतच झाला असं दाखवतो.
सापाला नियंत्रणात करणं, त्याला पकडणं सोपं काम नाही. सापाला पकडण्याचं प्रशिक्षण घेतलेले स्नेक कॅचर्सचीही सापांना पकडताना तारांबळ उडते. पण सध्या एका अशा सापाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. जो फक्त एका बोटानेच गार झाला. त्या सापाला बोट लावलं आणि जमिनीवर आडवाच झाला. VIRAL VIDEO - अंगावर घातलेल्या शर्टातून अचानक येऊ लागला विचित्र आवाज; आत डोकावताच फुटला घाम व्हिडीओ पाहून आपल्यालाही आश्चर्य वाटलं. एका बोटात साप कसं काय मरेल. तर बरोबर असं प्रत्यक्षात शक्यच नाही. खरंतर हा साप नाटक करतो आहे. जसं व्यक्ती त्याला स्पर्श करते तसा तो जमिनीवर कोसळून मृत झाल्याचं नाटक करतो. हा ड्रामेबाज साप सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. सापाने अशा पद्धतीने अॅक्टिंग केली आहे की ती पाहून तोंडातून सो क्युट असं येतं.
@braindorado इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. सापाचं हे असं रूप लोकांना खूप आ़वडलं आहे. काय मग तुम्हाला हा ड्रामेबाज साप कसा वाटला आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बाप रे बाप! हा तर सापांचा बाप; VIRAL VIDEO पाहून उडेल थरकाप या व्हिडीओत सापाने जे काही केलं, त्याला थानाटोसिस म्हणतात. ही प्रवृत्ती अनेक प्राण्यांमध्ये आढळते. प्राणी आपल्या संरक्षणासाठी असं करतात. जेव्हा कोणत्याही प्राण्याला आपल्या जीवाला धोका आहे असं वाचकं, तेव्हा तो या प्रक्रियेचा अवलंब करतो. याद्वारे तो आपल्या शिकाऱ्याला आपण आधीच मृत झाल्याची जाणीव करून देतो. त्यामुळे त्याच्यावर हल्ला करण्यात अर्थ नाही, असं समजून शिकारी हल्ला करत नाही. अनेक प्राणी अशा प्रकारे आपला जीव वाचवतात. तर काही प्राणी अशा पद्धतीने शिकार करतात. म्हणजे जे मृत असल्यासारखं दाखवतात. आपल्याला काही धोका नाही असं समजून दुसरा जीव त्यांच्या जवळ येताच ते अचानक उठतात आणि त्यांच्यावर हल्ला करून त्यांची शिकार करतात.