कारसमोर गाढवं
निशा राठोड/उदयपूर, 25 एप्रिल : 18 लाख रुपयांची गाडी किंमत ऐकूनच तुमचे डोळे पांढरे झाले असतील. आता इतकी महागडी गाडी घेतली तर साहजिकच कुणीही त्याची आपल्या जीवापेक्षाही जास्त काळजी घेईल. पण एक अशी व्यक्तीने जिने इतकी महाग कार खरेदी केली पण राजकुमारची लाखो रुपयांची ही गाडी चक्क गाढवांनी पळवली आहे. याचं कारणही शॉकिंग आहे. राजस्थानच्या उदयपूरमधील हे प्रकरण. राजकुमार नावाच्या व्यक्तीने मादडीमधील श्रीरामजी हुंडई शोरूममधून क्रेटा कार खरेदी केली. या नव्याकोऱ्या कारमधून ही व्यक्ती आपल्या मुलाच्या साखरपुड्यात गेली. पण ही कार चांगलीच महागात पडली. या कारमुळे त्याला शरमेने आपली मान खाली घालावी लागली. कारने राजकुमारची चांगलीच फजिती केली. याबाबत कंपनीकडे तक्रार केली असता, तिथूनही नीट उत्तर मिळालं नाही.
राजकुमार म्हणाला, त्याने हुंडईची क्रेटा कार टॉप सेकंड मॉडल जवळपास साडे अठरा लाख रुपयांना खरेदी केली. पण एक-दीड महिन्यातच कारमध्ये समस्या येऊ लागली. त्याच्या मुलाच्या साखरपुड्यात तर हद्दच झाल. मुलाच्या सासरच्यांसमोरच त्याची कार बंद झाली. त्यानंतर त्याला खूप राग आला. त्यानं कंपनीला फोन केला आणि कार घेऊन जायला सांगितली. कंपनीने कार घेऊन जाण्याची वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 7 असल्याची सांगितलं. आता आम्ही काहीच करू शकत नाही असं उत्तर दिलं. या 5 टिप्स करा फॉलो, कमी इंधनात जास्त मायलेज देईल तुमची कार! आधीच कार बिघडली, त्यात कंपनीने असं उत्तर दिलं त्यामुळे राजकुमारच्या रागाचा पारा चांगलाच चढला. त्याने शोरूमचा विरोध करण्याचं ठरवलं. यासाठी त्याने अनोखा मार्ग निवडला.
मुलाच्या साखरपुड्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याने आपल्या नव्या कारसमोर गाढवं बांधली आणि ते कार गाढवांनी खेचत शोरूममध्ये नेली. कंपनी शोरूम आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या व्यवहाराविरोधात विरोध दर्शवला