JOIN US
मराठी बातम्या / Viral / सुरेल गाणं गाणारं गाढव कधी पाहिलंय का? पुन्हा पुन्हा ऐकावा, पाहावासा वाटेल असा VIDEO

सुरेल गाणं गाणारं गाढव कधी पाहिलंय का? पुन्हा पुन्हा ऐकावा, पाहावासा वाटेल असा VIDEO

सुरात गाणं गाणाऱ्या गाढवाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

जाहिरात

गाणं गाणारं गाढव

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 मार्च : गाढवाला ओरडताना तुम्ही पाहिलंच असेल. गाढवाचा आवाज म्हणजे कर्कश कुणी मोठ्याने ओरडलं की आपण काय गाढवासारखा ओरडतोस असंही म्हणतो.  गाढवासा आवाज नकोसा वाटतो. पण सध्या अशा एका गाढवाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्याचा आवाज एकदा ऐकाल तर पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटेल. हे गाढव कर्कश ओरडण्याऐवजी चक्क गाणं गात आहे. गाणं गाणाऱ्या या गाढवाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. गाढवाचं गाणं, आवाज ऐकून सर्वजण थक्क झाले आहेत. गाढवाबाबतचा दृष्टिकोनच बदलायला लावणारा असा हा व्हिडीओ आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक गाढव दिसतं आहे. सुरुवातीला ते शांत उभं आहे. थोड्या वेळाने ते आपलं तोंड उघडतं. आता याचा बेसूर आवाज ऐकावा लागणार असं वाटतं. अरे पण हे काय? याचा आवाज तर इतका सुरेल आहे की तो गाढवाचाच आहे, यावर विश्वासच बसत नाही. म्हणजे डोळे बंद करून फक्त आवाज ऐकला तर गाढवाचा आवाज आहे, असं कुणी म्हणणारच नाही. खरंतर प्रत्यक्षात पाहूनही यावर विश्वास हसत नाही. VIDEO - श्वानांनी खतरनाक मगरीची धरली पाठ; तुम्ही विचारही केला नसाल असा शॉकिंग शेवट गाढव अशा सुरात आवाज काढतं जणू काही ते गाणं गातं आहे. ढँचू ढँचू करण्याऐवजी ते सुरात गातं आहे. त्यामुळे हे गाढव सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

@unilad इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे, त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

संबंधित बातम्या

तुम्ही कधी असं गाढव पाहिलं आहे का? गाढवाचा आवाज, गाणं तुम्हाला कसं वाटलं? ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या