JOIN US
मराठी बातम्या / Viral / तुमच्या बाईकवर कुत्रा कधीही भुंकणार नाही, 'ही' ट्रीक तुमच्या कामाची

तुमच्या बाईकवर कुत्रा कधीही भुंकणार नाही, 'ही' ट्रीक तुमच्या कामाची

प्रश्न असा आहे की, या हल्ल्यापासून कसं वाचायचं? किंवा स्वत:चं रक्षण कसं करायचं? चला जाणून घेऊ ट्रीक

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 फेब्रुवारी : तुम्ही हे बऱ्याचदा अनुभवले असेल की रात्रीच्या वेळी कुत्रे बाईक किंवा एकाद्या गाडीच्या मागे लागतात. अनेकदा ते फक्त भुंकतात. तर बऱ्याच वेळा हे कुत्रे लांबपर्यंत गाड्यांचा पाठलाग देखील करतात. तर काही कुत्रे गाडी चालकांवर हल्ला देखील करतातय अशा प्रकरणार अनेक लोक जखमी झाले आहेत, तर अनेकांनी आपले प्राण देखील गमवले आहेत. कुत्रे रात्रीच्या वेळी आपल्या प्रदेशाचे रक्षण करण्यासाठी जागे असतात. यादरम्यान त्यांना बाईक शिकारी वाटते. बाईक वेगाने चालते आणि मोठा आवाज करते, ज्यामुळे कुत्र्यांना त्यापासून धोका आहे असे वाटते आणि ते हल्ला करतात किंवा पाठलाग करतात. महिलांनी नारळ का फोडू नये? हिंदू धर्माचे हे नियम माहितीयत का? पण आता प्रश्न असा आहे की, या हल्ल्यापासून कसं वाचायचं? किंवा स्वत:चं रक्षण कसं करायचं? रस्त्यावर राहणारे बहुतेक कुत्रे सहसा कोणाला लवकर इजा करत नाहीत. त्यामुळे रात्रीचा प्रवास करताना नेहमी सोबत बिस्किटांचे पाकीट ठेवा. तुम्ही दररोज रात्रीच्या वेळी जिथून तुमच्या बाईकवरून जात असाल तिथून जर कुत्र्यांचा कळप असेल, तर तिथे थोडा वेळ थांबा आणि त्यांना बिस्किटे खायला द्या. कुत्रे त्यांना खायला घालणाऱ्या लोकांना आपला मित्र मानतात. दुसऱ्या दिवसापासून ते तुमच्यावर भुंकणार नाहीत. शिवाय ते तुमचं रक्षण देखील करतील. जेव्हा तुम्हाला रात्रीच्या वेळी कुत्र्यांचा कळप दिसेल तेव्हा लगेच तुमच्या दुचाकीचा वेग कमी करा, कुत्र्यांना घाबरुन जोरात गाडी चालवाल तर अडचणीत याल. बाईकचा वेग आणि मोठा आवाज ऐकून कुत्रे अनेकदा घाबरतात, म्हणून ते तुमच्यावर हल्ला करायला धावतात.

आणखी एक उपाय आहे जो तुम्ही करू शकता. ते म्हणजे आपल्यासोबत पाण्याची बाटली घेऊन जा, जेव्हा जेव्हा आक्रमक कुत्रे भुंकतात आणि तुमचा पाठलाग करतात तेव्हा थांबतात आणि त्यांच्या तोंडावर पाणी शिंपडतात. अशावेळी ते घाबरतील आणि परत जातील. (वरील माहिती ही सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज १८ लोकमत याची पुष्टी करत नाही)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या