कुत्र्याने मुलीला शिकवला धडा
मुंबई 02 जून : मानवाने नेहमीच प्राण्यांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. माणसांना नेहमीच असं वाटतं की ते प्राण्यांपेक्षा अधिक शक्तिशाली आणि बुद्धिमान आहेत. यामुळे ते त्यांच्या स्वतःच्या इच्छेनुसार त्यांच्यावर नियंत्रण ठेवतात आणि त्यांना त्रास देतात. पण जेव्हा प्राणी बदला घ्यायला येतात, तेव्हा माणसं काहीच करू शकत नाहीत. हेच दाखवणारा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यात एक कुत्रा मुलीकडून बदला घेतो. पण बदला घेताना तो इतकी हुशारी दाखवतो की तो त्याच्या शत्रूला चावत नाही किंवा त्याच्यावर भुंकत नाही, तरीही शत्रू ‘मातीत मिसळतो’! Scary video: भुकेल्या किंग कोब्राला दिले कुजलेले अन्न, रागाने मालकावरच केला हल्ला @_B___S या ट्विटर अकाउंटवर अनेकदा विचित्र व्हिडिओ पोस्ट केले जातात. नुकताच या अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये एक मुलगी कुत्र्याचा जबरदस्ती छळ करताना दिसत आहे. जोपर्यंत मनुष्य त्यांना त्रास देत नाही तोपर्यंत प्राणी मानवाला हानी पोहोचवत नाहीत. पण जेव्हा त्यांना माणसांचा त्रास होतो तेव्हा ते त्यांना सोडतही नाहीत. नुकतंच एका कुत्र्यानेही असेच काही केले.
व्हिडिओमध्ये दोन कुत्रे समुद्रकिनाऱ्यावर आरामात पडलेले दिसत आहेत. वाळूवर झोपून ते थंड वाऱ्याचा आनंद घेत असल्याचं दिसतं. पण त्यांच्या शेजारी एक मुलगी पडली आहे. ती देखील लहान मुलीसारखी दिसत आहे. त्यामुळे तिने केलेल्या खोडसाळपणाला चुकीचं म्हणता येणार नाही, कारण लहान मुलं अशी खोडसाळपणा करतात. यात दिसतं, की ती कुत्र्याला वारंवार लाथ मारत आहे आणि झोपू देत नाही. ती कधी तिच्या पायाने त्याच्या पोटावर लाथ मारताना तर कधी त्याला पुढे ढकलताना दिसत आहे. बराच वेळ सहन करूनही ती न थांबल्याने अखेर कुत्रा उठला आणि स्वतःच्या जागेवर वाळूत खड्डा खणायला लागला. असं करताना त्याने वाळू मागे फेकली जी थेट मुलीच्या अंगावर पडू लागली. कदाचित कुत्रा त्या मुलीचा पाळीव प्राणी असावा, यामुळे त्याने तिला इजा तर केली नाहीच पण आपली बुद्धिमत्ताही चांगली दाखवली. हा व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्याला 95 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने म्हटलं, की जर मुलगी आधीच तिथे असेल आणि कुत्रा येऊन तिच्या जवळ बसला असेल तर लोकांनी कुत्र्यांना समुद्रकिनाऱ्यावर आणू नये. आणखी एकाने म्हटलं की, काहीवेळा मुलं नकळत कुत्र्यांना छेडतात आणि त्यांच्या पालकांना वाटतं की ते गोंडस गोष्टी करत आहेत, असं होऊ नये. हेही वाचा - Maharashtra SSC Result 2023 Live updates: थोड्याच वेळात निकाल, न्यूज18 लोकमतवर सर्वात आधी पाहा