JOIN US
मराठी बातम्या / Viral / वरातीतील पाहुण्यांसोबत श्वानानेही धरला ठेका; असा डान्स कधीच पाहिला नसेल, VIDEO

वरातीतील पाहुण्यांसोबत श्वानानेही धरला ठेका; असा डान्स कधीच पाहिला नसेल, VIDEO

तुम्ही लग्नात लोकांना नाचताना अनेकदा पाहिलं असेल. मात्र, आता जो व्हिडिओ समोर आला आहे, त्यात तुम्हाला अतिशय अनोखा डान्स पाहायला मिळेल

जाहिरात

श्वानाचा डान्स व्हिडिओ

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 04 जुलै : सोशल मीडियावर सतत नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ असे असतात जे सगळ्यांनाच हैराण करतात, काही अंगावर काटा आणणारे तर काही मन जिंकणारे असतात. मात्र यातील काहीच व्हिडिओ असे असतात, जे वारंवार पाहण्याची इच्छा होते. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू येईल मात्र सोबतच कौतुकही वाटेल. हा व्हिडिओ एका लग्नसमारंभातील आहे. मात्र यात नवरी-नवरदेवाने नाही तर चक्क एका श्वानाने सर्वांचं लक्ष वेधलं. तुम्ही लग्नात लोकांना नाचताना अनेकदा पाहिलं असेल. मात्र, आता जो व्हिडिओ समोर आला आहे, त्यात तुम्हाला अतिशय अनोखा डान्स पाहायला मिळेल. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की वरातीतील इतर पाहुण्यांसोबतच एक श्वानही आनंदात बँड-बाजाच्या तालावर नाचत आहे.

संबंधित बातम्या

या श्वानाचा उत्साह आणि डान्स पाहून इतर लोकही मजेत नाचू लागले. श्वान अगदी बँडच्या तालावर जबरदस्त डान्स करत आहे. या श्वानाचा डान्स सगळ्यांच्या इतका पसंतीस उतरला की लोकांनी त्याचा व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. इतकंच काय तर लग्नाच्या रेकॉर्डिंगसाठी आलेला कॅमेरामॅनही लोकांना सोडून श्वानाचा व्हिडिओ काढू लागला. तरुणांनाही लाजवेल असा उत्साह; ‘बिंदिया चमकेगी’ गाण्यावर 93 वर्षीय आजीचा भन्नाट डान्स, VIDEO कुत्र्यांशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर खूप पसंत केले जातात. लोक त्यांच्या व्हिडिओंवर मीम्स देखील बनवतात, जे खूप मजेदार असतात. आता व्हायरल झालेला व्हिडिओही लोकांना खळखळून हसवत आहे. तर काही लोकांनी असा दावा केला आहे की कुत्रा नाचत नसून त्याला काहीतरी आजार आहे. आजारपणामुळे तो उडी मारत आहे. एका यूजरने लिहिलं की, ‘हा विनोद नाही, तो आजारी आहे.’ तर दुसऱ्याने लिहिलं की, ‘तुम्ही मुक्या जीवाची चेष्टा का करत आहात.’ आणखी एका युजरने लिहिलं की, ‘असं दिसतं की तो त्याच्या मागील जन्मी डान्सर होता.’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या