JOIN US
मराठी बातम्या / Viral / मृत्यूच्या दाढेतून परत आला कुत्रा; अंगावरुन ट्रेन गेली पण पुढच्याच क्षणी..., थक्क करणारा Video

मृत्यूच्या दाढेतून परत आला कुत्रा; अंगावरुन ट्रेन गेली पण पुढच्याच क्षणी..., थक्क करणारा Video

अचानक रुळावर बसलेला कुत्रा ट्रेनच्या समोर धावताना दिसतो. मात्र ट्रेनचा वेग जास्त असल्याने अचानक कुत्रा ट्रेनखाली येतो. पण…

जाहिरात

अंगावरुन ट्रेन गेली तरी वाचला श्वान

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 09 जुलै : देव तारी त्याला कोण मारी, ही म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल. याचा प्रत्यय देणाऱ्या काही घटनाही बऱ्याचदा समोर येतात. जेव्हा देव एखाद्याला मदत करत असतो, आपल्या आश्रयाने त्याची काळजी घेत असतो, तेव्हा त्याचा जीव कोणी घेऊ शकत नाही. मग तो प्राणी असो की माणूस. एका श्वानाच्या बाबतीत असंच घडलं. एक जुना व्हिडिओ इंस्टाग्रामवर पुन्हा व्हायरल होऊ लागला आहे, ज्यामध्ये एक कुत्रा मृत्यूच्या जबड्यातून परत आल्याचं पाहायला मिळतं. @ilhanatalay_ या Instagram अकाऊंटवर नुकताच एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे, ज्यामध्ये एक ट्रेन रुळावरून जाताना दिसत आहे आणि एक कुत्रा त्याच्या समोरून धावत आहे. भटके प्राणी अनेकदा रेल्वेच्या रुळांवरून चालताना तुम्ही पाहिले असतील, त्यात काही नवीन नाही. कधी गाय तर कधी कुत्रा सहज ट्रॅकवर येतात. अनेकदा यामुळे ट्रेनला धडकून त्यांचा मृत्यू होतो. मात्र व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये असं काही पाहायला मिळतं, जे पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

संबंधित बातम्या

या व्हिडिओमध्ये ट्रेन रुळावरून वेगाने जाताना दिसत आहे. इतक्यात अचानक रुळावर बसलेला कुत्रा ट्रेनच्या समोर धावताना दिसतो. मात्र ट्रेनचा वेग जास्त असल्याने अचानक कुत्रा ट्रेनखाली येतो. हे दृश्य पाहून तुम्हाला वाटेल की आता श्वानाचा मृत्यू निश्चित आहे आणि तुम्ही घाबरून डोळे बंद कराल. पण पुढे काही वेगळंच पाहायला मिळतं. काहीच वेळात हा कुत्रा ट्रेनखालून बाहेर येतो आणि धावत शेताकडे जातो. ट्रेनखाली येऊनही कुत्रा सुखरूप मृत्यूच्या दारातून परत आला. हे पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. Viral Video : ओवरटेक करणं ट्रक ड्रायवरला पडलं महागात, पुढे जाताच घडला भयंकर अपघात या व्हिडिओला 10 लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर, अनेकांनी कमेंट करून यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक यूजर म्हणाला - तो कुत्रा खूप भाग्यवान आहे. दुसऱ्याने म्हटलं, की ज्यांचा देवावर विश्वास नाही त्यांनी हा व्हिडिओ पाहावा. तिसरा म्हणाला - एक म्हण आहे, जेव्हा तुमची वेळ आलेली नसते, तेव्हा मृत्यू तुम्हाला स्पर्शही करू शकत नाही. आणखी एका यूजरने म्हटलं, की जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुमच्यासाठी काहीही अशक्य नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या