(Photo_Twitter_@Israel)
जेरूसालेम, 14 जुलै : भगवान शंकराने श्रीगणेशाचं डोकं कापून पुन्हा जोडलं, श्रीगणेशाची ही कथा तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. पुराणातील ही घटना आता प्रत्यक्षात झाल्याचं कधी कुणी पाहिलं नाही. पण आता असा चमत्कार झाला आहे. डॉक्टरांनी महादेवासारखा चमत्कार करून दाखवला आहे. अपघातात मुलाचं धडावेगळं झालेलं डोकं पुन्हा जोडण्यात आलं आहे. पॅलेस्टाईनचा रहिवासी असलेला 12 वर्षीय सुलेमान हसन दुचाकीवरून जात असताना कारने त्याला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की त्याचं डोकं धडापासून वेगळं झालं. त्याच्या कवटीचा खालील भाग आणि पाठीच्या मणक्याचा वरचा भाग वेगळे झाले. फक्त त्वचा जोडलेली होती. जेव्हा डोक्याला अचानक मार लागल्याने मणक्याच्या वरपर्यंत कवटीला आधार देणारे अस्थिबंधन आणि स्नायू फाटतात तेव्हा असं होतं. या प्रकारची दुखापत अत्यंत दुर्मिळ आहे. मणक्याच्या दुखापतीच्या जगात आलेल्या सर्व प्रकरणांमध्ये अशा केसेस एक टक्क्याहून कमी दिसतात. धक्कादायक! पाणी पिताना एक चूक आणि मृत्यूच्या दारात पोहोचला मुलगा सुलेमानला तात्काळ जेरुसलेमच्या ट्रॉमा युनिटमध्ये नेण्यात आलं आणि ताबडतोब शस्त्रक्रिया करण्यात आली. बऱ्याच वेळाच्या ऑपरेशननंतर डॉक्टरांनी त्याचं डोकं धडाला पुन्हा जोडण्यात यश आलं. ही दुखापत जूनमध्येच बरी झाली, पण पूर्ण निकाल पाहायचा असल्याने डॉक्टरांनी महिनाभर ते उघड केलं नाही. ही शस्त्रक्रिया करणार्या सर्जनपैकी एक डॉ. ओहद ईनाव यांनी टाइम्स ऑफ इस्रायलला सांगितलं की, “आम्ही मुलाच्या जीवासाठी लढलो आणि शेवटी आम्हाला यश मिळालचं. रक्तवाहिन्या नीट असतानाच अशी शस्त्रक्रिया शक्य आहे, कारण मेंदूला रक्तपुरवठा सुरळीत ठेवला पाहिजं. सुदैवाने या मुलाचं तसं होतं, त्याच्या सर्व नसा वाचल्या. Viral Video: तुम्हीही शिळा भात खाता? माइक्रोस्कोपखाली ठेवताच दिसलं असं काही की पाहून धक्काच बसेल तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की त्याला कोणतीही न्यूरोलॉजिकल समस्या नाही. तो कोणाच्याही मदतीशिवाय चालू शकतो. सुलेमानचे वडील म्हणाले, माझ्या लाडक्या एकुलत्या एक मुलाला वाचवल्याबद्दल मी आयुष्यभर सर्व डॉक्टरांचा ऋणी राहीन.