नवी दिल्ली 14 जुलै : माणसाने ताजं अन्न खायला पाहिजे, हे जगातील जवळपास प्रत्येक व्यक्तीला माहीत आहे. भारतात प्राचीन काळापासून ताजं अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो. अन्न तयार झाल्यानंतर लगेचच खावं, असंही डॉक्टर सांगतात. जास्त दिवस ठेवलेलं अन्न कधीही खाऊ नका, असा सल्ला दिला जातो. पूर्वी फ्रीज नसताना लोक ते अन्न त्याचवेळी खाऊन संपवायचे किंवा उरलेलं अन्न गायींना किंवा कुत्र्यांना खायला घालायचे. पण फ्रीज आल्यापासून लोकांनी आता उरलेलं अन्न फ्रीजमध्ये ठेवून नंतर गरम करून खायला सुरुवात केली आहे. मात्र फ्रिजमध्ये ठेवलेलं अन्नही काही काळानंतर खराब होतं, त्यामुळे ते खाणं टाळावं. पण बरेच लोक हे करत नाहीत. ते अनेक दिवस साठवलेलं अन्नच खातात. याचा परिणाम म्हणजे त्यांची तब्येत बिघडते. सध्या सोशल मीडियावर अन्नातील बॅक्टेरिया दाखवणारे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. आज आम्ही तुम्हाला जो व्हिडिओ दाखवणार आहोत, त्यात फ्रिजमध्ये ठेवलेल्या शिळ्या भाताचं वास्तव दाखवण्यात आलं आहे. फ्रिजमधून बाहेर काढलेल्या भाताच्या दाण्यांमध्ये असलेले बॅक्टेरिया यात दिसत आहेत. अति प्रमाणात पेनकिलर औषधांचं सेवन ठरू शकतं धोकादायक; होऊ शकतात `हे` गंभीर आजार व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने फ्रिजमधून भात काढला आहे. त्या व्यक्तीने फ्रिजमधील प्लेटमध्ये ठेवलेल्या भातामधील एक दाणा उचलला आणि टेस्टिंग प्लेटवर ठेवला. यानंतर यावर डिस्टिल्ड वॉटरचे काही थेंब टाकले. मग भात दाबून माइक्रोस्कोपखाली ठेवला. त्या व्यक्तीने लेन्स झूम करताच त्याला धक्का बसला. या भातामध्ये अनेक बॅक्टेरिया फिरताना दिसले. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही शॉक व्हाल.
मात्र, या व्हायरल व्हिडिओसोबत सगळेच सहमत होताना दिसले नाही. एका व्यक्तीने लिहिलं की, खाण्याच्या प्रत्येक पदार्थात बॅक्टेरिया असतात. अनेक बॅक्टेरिया पोटासाठी खूप चांगले असतात. ते मानवांना अन्न पचवण्यास मदत करतात. तसंच हा भात बऱ्याच दिवसांचा असू शकतो, असं अनेकांनी लिहिलं. शिळा भात एका दिवसानंतर खाल्ल्यास नुकसान होत नाही, असं काहींनी म्हटलं. इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.