वॉशिंग्टन, 13 जुलै : पाण्याला जीवन, अमृत म्हणतात. प्रत्येक सजीवाला पाण्याची गरज असते. पाणी प्यायलं नाही तर मृत्यू होऊ शकतो, पण पाणी पिऊन कुणाचा मृत्यू झाल्याचं तुम्ही ऐकलं आहे का? जीवन म्हटलं जाणारं पाणी जीव घेऊ शकतो, असं सांगितलं तर साहजिकच धक्का बसू शकतो. पण असंच एक शॉकिंग प्रकरण समोर आलं आहे. पाणी प्यायल्याने एक मुलगा मृत्यच्या दारात गेला. पाणी पिताना त्याने केलेली एक चूक त्याला महागात पडली. अमेरिकेतील हे अजब प्रकरण आहे. दक्षिण कॅरोलिनात राहणारा 10 वर्षांचा रे जॉर्डन. 4 जुलै रोजी घरात आपल्या चुलत भावांसोबत खेळत होता. अचानक त्याला गरम होऊ लागलं म्हणून तो पाणी प्यायला गेला. बाटलीतून तो पाणी पिऊ लागला. पण त्यानंतर त्याची प्रकृती खालावली.
तो बेशुद्ध होऊ लागला. त्याला त्याचा तोल सावरता येत नव्हती. त्याचा सामना मृत्यूशीच झाला. त्याच्या पालकांनी सांगितलं की, मुलगा ड्रग्स घेतल्यासारखं किंवा दारू प्यायलासारखा वाटत होता. त्याला उलट्याही होऊ लागल्या. चमत्कार! चाळीशीचाच राहिला हा डॉक्टर, एक दिवसही वाढत नाही याचं वय; फॉलो करतो हा सिक्रेट फॉर्म्युला त्याची प्रकृती पाहून पालकांनी त्याला तातडीने रिचलँड चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये नेलं. रेच्या तात्काळ वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या, ज्यामध्ये त्याला पाण्याची नशा झाल्याचं दिसून आलं. खरं तर, त्याची सोडियम पातळी पूर्णपणे कमी झाली होती. ही स्थिती तेव्हा उद्भवते जेव्हा किडनी जास्त पाणी फिल्टर करू शकत नाही, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला चक्कर येऊ शकते, तो कोमात जाऊ शकतो आणि मृत्यू देखील होऊ शकतो. त्याला पाणी पिताना त्याची आई स्टेसीने त्याला पाहिलं होतं. ती म्हणाली, रात्री साडेआठ ते साडेनऊच्या दरम्यान तो इतकं पाणी प्यायला की तो आजारी पडला. तो एका तासात 6 बाटल्या गटागटा पाणी प्यायला होता. त्याचा हा असा भयंकर परिणाम झाला. दहा वर्षाच्या चिमुकल्याचा डोळ्यात वाढत होते किळसवाणे किडे, डॉक्टरकडे गेला आणि धक्काच बसला डेली स्टारच्या वृत्तानुसार या मुलाला असे पदार्थ देण्यात आले ज्यामुळे तो अधिकाधिक लघवी करू शकेल. क्टरांनी लगेच त्याला सोडियम आणि पोटॅशियम देण्यास सुरुवात केली. वेळीच उपचार झाल्याने त्याचा जीव वाचला.