प्रतिकात्मक फोटो
मुंबई, 11जून : सापाचं विष इतकं विषारी असतं की त्यामुळे एखाद्याचे प्राण देखील जाऊ शकतात. एवढंच काय तर कधी कधी माणसाला पॅरालिसीसचा ही धोका असतो. सापाने एकदा का दंश घेतला की मग खेळच संपला. तसेच कोब्रा साप तर खूपच धोकादायक आहेत. शिवाय असे काही साप आहेत ज्यांचे विष काही मिनिटांत माणसाचा जीव घेऊ शकते. सापांच्या प्रजातींबाबत अनेक अहवाल समोर आले आहेत. पण सापांबद्दल असे फॅक्ट्स आम्ही तुमच्यामाहीतीसाठी घेऊन आलो आहोत, जे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. साप जर मेलेला असेल आणि त्याचं विष आपल्या संपर्कात आलं किंवा सापाच्या दातांवर/डोक्यावर आपला पाय पडला तर त्याच्या विषाने माणूस मरु शकतो का? असा प्रश्न अनेकांच्या मनात असेल. King Cobra : साप खरंच मीठाचं वर्तुळ पार करु शकतो का? व्हिडिओत जे घडलं त्याची कल्पना करू शकत नाही जर तुम्ही विचार करत असाल की साप मेलेला आहे, त्यामुळे त्याचं विष आता तुम्हाला काहीही करु शकणार नाही, तर तुम्ही चुकीचा विचार करताय. हे लक्षात घ्या की विष हे विष असतं, त्यामुळे साप मेला तरी देखील त्याचं विष तसंच काम करतं. चला आम्ही जगातील धोकादायक सापांबद्दल माहिती जाणून घेऊ. ब्लॅक मांबा हा जगातील सर्वात प्राणघातक सापांपैकी एक आहे. आफ्रिकेत आढळणाऱ्या या सापाच्या विषाचे दोन थेंबही माणसाचा जीव घेऊ शकतात. तो आपल्या शिकाराला संधी देत नाही आणि अचानक हल्ला करतो. या सापाच्या विषामुळे पीडित व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येतो आणि बहुतेक प्रकरणांमध्ये, ब्लॅक माम्बाने दंश केलेला व्यक्ती किंवा प्राणी मरण पावला आहे. खरंच नागाला मारल्यावर नागीण बदला घेते? सापांसंबंधीत काही मान्यता आणि सत्य कोब्रा हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात विषारी साप आहे. शिकार करण्यापूर्वी तो शांतपणे आपल्या शिकाराजवळ जातो. हे तीन ते चार वेळा आक्रमण करते आणि त्याचे विष 15 मिनिटांत कोणालाही मारु शकते. अमेरिकन फेर-डे-लान्स हा देखील एक धोकादायक साप आहे. त्याचे विष दंश केल्यानंतर लगेच शरीरात पसरते. हा अमेरिकेतील सर्वात धोकादायक सापांपैकी एक आहे. ग्रीन ट्री स्नेक किंवा बूमस्लॅंग हा दक्षिण आफ्रिकेत आढळतो. तो आवाज न करता आपल्या शिकाराजवळ जातो. त्याचे तीक्ष्ण दात अतिशय विषारी असतात. भारतात आढळणारा रसेल व्हायपर सापही अतिशय धोकादायक आहे. रसेल वायपरमुळे भारतात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. त्याच्या विषामुळे मूत्रपिंड निकामी होणे, जास्त रक्तस्त्राव होणे आणि बहु-अवयव निकामी होऊ शकते. याच्या दंशाने काही मिनिटांत एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो. अंतर्देशीय तैपन हा देखील जगातील विषारी सापांपैकी एक आहे. अंतर्देशीय तैपन प्रामुख्याने ऑस्ट्रेलियामध्ये आढळते. हे सहसा मध्यम ते मोठ्या आकारात पाहिले जाते. हे साप दिवसा सर्वात जास्त सक्रिय असतात. तुम्हाला हे जाणून धक्का बसेल की 110 मिलीग्राम इनलँड तैपनचे विष 100 निरोगी पुरुषांना मारू शकते.