मृत मासा जिवंत.
मुंबई, 13 मे : माणूस वा असो प्राणी… कोणताही जीव ज्याचा एकदा मृत्यू झाला की तो जिवंत होत नाही. पण अशी काही प्रकरणं आहेत, ज्यात मृत जिवंत झाल्याचे दावे केले जातात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. ज्यात चक्क एक मृतावस्थेत असलेला मासा अचानक जिवंत झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर सर्वजण थक्क झाले आहेत. एक असा मासा जो सुकून पूर्णपणे दगड झाला आहे. त्याच्या शरीरात काही हालचालच नाही आहे. त्याला उचलून आपटलं तरी काही नाही. त्याच्या शरीराचे भागही सहज तुटत आहे. पण तरी माशात अचानक जीव आला. हा व्हिडीओ तसा कोणत्या चमत्कारापेक्षा कमी नाही.
व्हिडीओत तुम्ही पाहाल तर कोरड्या जमिनीवर हा मासा दिसतो आहे. ज्याचा रंग पूर्णपणे उडाला आहे. सिमेंट, दगडासारखा तो कडक झाला आहे. त्याच्या डोळ्यातही छेद दिसत आहेत. व्यक्ती त्या माशाला उचलते आणि जमिनीवर आपटते. तरी माशात काहीच हालचाल नसते. त्यानंतर तो त्याच्या शेपटीकडील किंचितसा भाग मोडतो, जो पटकन तुटून त्याच्या हातात येतो. एकंदर पाहिल्यावर मासा मृत झाल्याचं दिसतं. Shocking! मासे खाणाऱ्यांनो जरूर वाचा ही बातमी; नाहीतर तुमच्याही जीवावर बेतेल पण नंतर ही व्यक्ती त्या माशाला उलटं करते आणि त्याच्या तोंडावर पाणी टाकते. त्यावेळी माशाचं तोंड हलताना दिसतं. पाणी तोंडावर पडताच तो जिवंत होतो. ते पाणी पितो. इन्स्टाग्राम पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार हा मासा सकरमाऊथ कॅटफिश आहे. त्याला प्लेसो म्हणूनही ओळखलं जातं. ज्याच्याकडे निष्क्रिय अवस्थेत जाण्याची क्षमता असते. तो पूर्णपणे कोरडा होऊ शकतो. यामुळे हा मासा कोरड्या ठिकाणी पाऊस पडेपर्यंत पाण्याशिवाय काही महिने जिवंत राहतो. जेव्हा त्याच्यावर पाणी पडतं तेव्हा त्याच्यात पुन्हा जीव येतो, तो जिवंत होतो. चुकूनही खाल तर तुमच्या जीवाला धोका; बंदी असूनही विकला जातोय हा खतरनाक मासा इन्स्टाग्राम अकाऊंटवर या अनोख्या माशाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्याला पाहून सर्वजण थक्क झाले आहेत.
तुम्हाला या माशाबाबत आणखी काही माहिती असेल तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.