JOIN US
मराठी बातम्या / Viral / बापरे! तरुणांनाही जमणार नाही असा वृद्धाचा खतरनाक बाईक स्टंट, VIDEO एकदा पाहाच

बापरे! तरुणांनाही जमणार नाही असा वृद्धाचा खतरनाक बाईक स्टंट, VIDEO एकदा पाहाच

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक वृद्ध व्यक्ती तरुणांप्रमाणेच राईडचा आनंद लुटताना दिसत आहे. तो केवळ वेगाने बाइक चालवत नाही तर दोन्ही हात हँडलवरून काढतो आणि बाइकवर उडी मारतानाही दिसतो.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 23 मार्च : लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीही करायला तयार असतात. सोशल मीडियाचा वापर वाढल्यापासून हे काम अधिक सोपं झालं आहे. यात स्टंट व्हिडिओ हा तुमचा व्हिडिओ हिट बनवण्याचा एक चांगला मार्ग आहे. काही लोक आपल्या व्हिडिओ आणि फोटोंना लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी असे धोकादायक स्टंट करतात, जे पाहिल्यानंतर कोणाच्याही हृदयाचे ठोके वाढतात. मात्र ही क्रेझ तरुणांमध्येच नाही तर वृद्धांमध्येही आहे. कधीकधी असे धोकादायक स्टंट वृद्ध लोकही करतात. असाच एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. चिमुकल्याला बसवून बाईक वळवत होती व्यक्ती, समोरुन भरधाव कार आली आणि… असं म्हणतात की वय हा फक्त एक आकडा असतो. फक्त तुमचं मन खूश असेल तर तुम्ही ती कामंही करू शकता, जी एखादा तरुण करतो. वयाच्या संख्येत स्वतःला कैद करणं योग्य नाही, जे असं करतात त्यांना आपलं आयुष्य मोकळेपणाने जगता येत नाही. पण जे वयाच्या उंबरठ्यातून बाहेर पडतात आणि आयुष्य जगतात, ते केवळ आनंदी राहत नाहीत तर आजूबाजूच्या लोकांनाही आनंदी ठेवतात. मोटारसायकलवर आनंदाने स्टंट करताना दिसणार्‍या एका वृद्धाने हे सिद्ध केलं आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्या चेहऱ्यावरही हसू येईल.

संबंधित बातम्या

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक वृद्ध व्यक्ती तरुणांप्रमाणेच राईडचा आनंद लुटताना दिसत आहे. तो केवळ वेगाने बाइक चालवत नाही तर दोन्ही हात हँडलवरून काढतो आणि बाइकवर उडी मारतानाही दिसतो. एवढंच नाही तर सीटवरून उडी मारताना तो आपले दोन्ही हात हवेत फिरवू लागतो. त्यांच्याकडे बघून जणू काही किशोरवयीन मुलगा गाडीवर मस्ती करत आहे, असं वाटतं. मात्र या व्यक्तीचा स्टंट पाहून काहींनी त्यांचं कौतुक केलं आहे. तर काहींनी हे अतिशय वाईट असल्याचं म्हणत व्यक्तीला चुकीचं ठरवलं आहे.

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर aisahebh_official_07 नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. जो बातमी लिहिपर्यंत 1.75 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे आणि त्यावर कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिलं की, ‘या वयातही त्यांची एनर्जी प्रो लेव्हलवर आहे.’ तर दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘चुकून पडला तर, तुम्ही तुमचं उर्वरित आयुष्य बेडवर घालवाल.’ याशिवाय इतरही अनेकांनी व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या