ट्रकला बऱ्याचदा सहा किंवा त्यापेक्षा जास्त टायर्स असतात. असं का?
एखाद्या ट्रकला किती टायर्स असावेत हे कसं ठरतं? तुम्हाला माहितीय? चला याची आपण माहिती घेऊ.
ट्रकवरील टायर्सची संख्या ट्रक वाहून नेण्यासाठी डिझाइन केलेल्या वजनावरून निर्धारित केली जाते.
Small Commercial Vehicle
छोटी व्यावसायिक वाहने 3.5 टनांपेक्षा कमी वजन उचलतात. या ट्रकला ४ टायर असतात आणि सामान्यतः 13 15 15 इंच आकाराचे असतात.
Light Commercial Vehicle
हे ट्रक 4-5 टन ते 11 टनांपर्यंतचे भार उचलतात. या ट्रकमध्ये 16-17 इंच आकाराचे टायर आहेत, तसेच या ट्रकला 6 टायर आहेत.
Medium Commercial Vehicle
हे ट्रक 12 टन ते 16 टनांपर्यंतचे भार उचलतात. या ट्रकमध्ये 20 इंच आकाराचे टायर आहेत. या ट्रकला 6 टायर असतात.
Heavy Commercial Vehicle
16 टन पेक्षा जास्त वजन उचलणाऱ्या ट्रकना अवजड व्यावसायिक वाहने म्हणतात. या ट्रक्समध्ये 20इंच आकाराचे टायर आहेत.
हे इतर ट्रकच्या टायरपेक्षा रुंद असतात. जर गाडीवरी वजन वाढले तर टायर आणि एक्सलची संख्या वाढते
उदा. 25 टनमध्ये 10 टायर असतील 31 टनमध्ये 12 टायर असतील 37 टनमध्ये 14 टायर असतील
अशाप्रकारे कोणत्याही ट्रकच्या एक्सलची संख्या आणि त्यावर बसवलेल्या टायरची संख्या तो वाहून नेऊ शकणार्या भारावरून ठरवलं जातं.