छोटासा खतरनाक जीव.
मुंबई, 15 फेब्रुवारी : जगात असे अनेक प्राणी आहेत जे दिसायला अगदी लहान असले तरी इतर प्राण्यांपेक्षा जास्त विषारी असतात. अशाच एका जीवाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा जीव सापाइतकाच खतरनाक आहे. जो चावला तर काही मिनिटांतच माणसाचा मृत्यू होऊ शकतो. इतका भयंकर जीव एका महिलेने चुकून हातात धरला. तिचं काय झालं ते तुम्हीच पाहा. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता महिलेने आपल्या हातात हा जीव धरला आहे. तो इतका छोटा आहे की कोळीच वाटावा. निळ्या रंगाचा हा प्राणी म्हणजे एक ऑक्टोपस आहे. साधासुधा ऑक्टोपस नव्हे तर सर्वात विषारी ऑक्टोपस. ज्याचं नाव ब्लू रिंग्ड ऑक्टोपस आहे. @HowThingsWork_ या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यात या ऑक्टोपसबाबत माहितीही देण्यात आली आहे. हे वाचा - Tick bite : या छोट्याशा कीटकापासून दूरच राहा; चावला तर तुमच्या खाण्याचाही होईल वांदा ट्विटर पोस्टमध्ये म्हटल्यानुसार, या महिलेला माहिती नव्हतं की तिनं ब्लू रिंग्ड ऑक्टोपस उचलला होता. ज्याचं विष सायनाइडपेक्षा हजार पट जास्त विषारी आहे आणि केवळ एका मिनिटात 20 लोकांना मारू शकते. भितीदायक बाब म्हणजे याच्या चाव्याची खूण इतकी लहान असते आणि वेदना इतकी कमी असते की अनेकांना चावल्याचंही कळत नाही.
हा व्हिडीओ पाहून या ऑक्टोपसबाबत समजल्यानंतर काही युझर्सनी त्या महिलेबाबत चिंता व्यक्त केली आहे. तिच्याबाबत विचारणा केली आहे. पण या महिलेचं नेमकं काय झालं त्याची माहिती नाही. दरम्यान एका युझरने प्राण्यांमध्ये निळे रंगद्रव्ये बनणं खूप कठीण आहे, निसर्गानुसार हे विष असतं. त्यामुळे निळ्या रंगाचा प्राणी दिसला तर त्याच्यापासून दूरच राहा, असा सल्ला दिला आहे. हे वाचा - या जीवांमधील संबंध म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मादीशी संबंधानंतर जातो नराचा जीव कारण… असे आपल्या आसपास कितीतरी प्राणी असतात, जे आपल्याला छोटे वाटतात. त्यांच्यापासून आपल्या जीवाला धोका नाही असं वाटतं. काही जण तर कुतूहलाने त्या प्राण्याला स्पर्श करतात, हातात घेतात. जे या महिलेनं केलं.
तुम्हाला असा एखादा छोटासा पण खतरनाक प्राणी माहिती असेल तर त्याबाबत आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जेणेकरून इतरही लोक अशा प्राण्यांपासून सावध राहतील.