छोट्याशा कोळीची आपल्याला फार भीती वाटत नाही. हा कोळी काय करणार असंच वाटतं. पण एक असा कोळी आहे जो छोटा असला तरी तो खूप खतरनाक आहे.
हा कोळी आहे ब्लॅक विडो स्पाइड, ज्याचं वैज्ञानिक नाव लेट्रोडेक्टस आहे. हे कोळी विषारी असतात जे सापापेक्षाही खतरनाक मानले जातात.
जर तो माणसांना चावला तर स्नायूंमध्ये वेदना होतात. स्नायू आखडतात. त्या व्यक्तीच्या डोळ्यांची दृष्टी हळूहळू जाते, श्वास घ्यायलाही त्रास होतो.
धक्कादायक म्हणजे ब्लॅक विडो स्पाइड मादा भूक लागली तर नरालाही सोडत नाही. काही वेळा संभोगानंतर आपल्या नर पार्टनरलाच ती खाते, त्यालाच आपलं भक्ष्य बनवते.
नर कोळीसाठी मादी कोळीसोबत संबंध ठेवणं म्हणजे जीवनमृत्यूचा प्रश्न असतो. पण सुदैवाने निसर्गाने नर कोळीला यासाठी हत्यारही दिलं आहे.
मादा कोळी भुकेली असेल तर तिच्या शरीरातून एक रसायन निघतं. ज्यामुळे नर कोळीला ती भुकेली आहे की नाही हे समजतं.
आता इतके खतरनाक कोळी आढळतात कुठे? तर उत्तर अमेरिका आणि कॅनडामध्ये हे कोळी आढळतात. निळ्या रंगाचे असलेले हे कोळी ज्यांच्या पाठीमागे लाग रंग असतो. (सर्व फोटो सौजन्य - Canva)