JOIN US
मराठी बातम्या / Viral / महाकाय अस्वल करतोय व्यायाम; क्युट Video होतोय व्हायरल

महाकाय अस्वल करतोय व्यायाम; क्युट Video होतोय व्हायरल

आजकाल लोक सोशल मीडियावर तासनतास वेळ घालवताना दिसतात. दिवसातील बराच वेळ सोशल मीडियावर घालवल्यावर अनेक व्हिडीओ फोटो समोर येत असतात.

जाहिरात

व्हायरल व्हिडीओ

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी : आजकाल लोक सोशल मीडियावर तासनतास वेळ घालवताना दिसतात. दिवसातील बराच वेळ सोशल मीडियावर घालवल्यावर अनेक व्हिडीओ फोटो समोर येत असतात. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मजेशीर, हटके, विचित्र, भयानक व्हिडीओ सोशल मीडियावर फिरताना दिसतात. खास करुन प्राण्यांच्या व्हिडीओंना तर नेटकऱ्यांची खास पसंती असते. प्राण्यांच्या शिकारीचे थरारक व्हिडीओ असतात तर काही मजेशीर आणि क्युट व्हिडीओ समोर येत असतात. अशातच आणखी एक क्युट व्हिडीओ समोर आला आहे. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जे युजर्सचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडिओमध्ये एक महाकाय अस्वल दिसत आहे. जो आपल्या गोंडस शैलीने सर्वांचे मन जिंकत आहे. व्हिडीओमध्ये दिसतंय की अस्वल क्युट अंदाजात व्यायाम करत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स तो अनेकवेळा पाहताना दिसत आहेत. हेही वाचा -  जुन्या ब्रेडला फ्रेश दिसण्यासाठी लावला पेंट; Shocking Video व्हायरल व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ IFS अधिकारी गीतांजली यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्याच्या या व्हिडिओमध्ये एक विशाल अस्वल माणसाप्रमाणे जमिनीवर बसलेले दिसत आहे. मागच्या पायाचे पंजे पुढच्या पायाच्या पंजेने ताणलेले दिसत आहे. त्याच्याकडे बघून हे अस्वल त्याच्या उत्तम आरोग्यासाठी योगासने आणि व्यायाम करण्याचीही तयारी करत असल्याचे पहायला मिळतंय.

संबंधित बातम्या

व्हिडिओ शेअर करण्यासोबतच IFS अधिकारी गीतांजली यांनी ‘दिवसाची सुरुवात करण्यासाठी वॉर्मअप’ असे कॅप्शन लिहिले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्याला 10 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओ पाहताना, वापरकर्ते सतत कमेंट करत आहेत आणि याला खूप सुंदर व्हिडिओ म्हणत आहेत. एका यूजरने कमेंट करत ‘योग करा, निरोगी राहा’ असे लिहिले. दुसऱ्याने लिहिले की, तिला हा व्हिडिओ सतत पाहू वाटतोय.

दरम्यान, असे अनेक क्युट आणि मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत असतात. यापूर्वीही असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या