नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी : दैनंदिन जीवनात आपण अनेक वेगवेगळ्या गोष्टींचं सेवन करत असतो. मात्र आपण जे पदार्थ खातो ते घेताना त्याकडे व्यवस्थित लक्ष देतो का? हेदेखील तितकंच महत्त्वाचं आहे. आपण काही गोष्टी विकत घेत असतो, मात्र दुकानदार वस्तूंमध्ये भेसळ करण्यासोबतच फसवणूक करताना दिसून येतात. अगदी काही पैशांसाठी लोक असे घाणेरडे कृत्य करतात. असाच आणखी एक प्रकार समोर आला असून याचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. तुम्ही ब्रेड खात असाल तर सावधान. कारण तुम्ही जो ब्रेड खात आहात तो भेसळयुक्त असू शकतो. ज्यामुळे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होईल. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, दोन लोक एका दुकानात जुन्या आणि शिळ्या ब्रेडवर पेंट फवारताना दिसत आहेत जेणेकरून ते ताजे दिसावे. जे पाहून यूजर्सचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. सध्याच्या काळात जिथे मोठ्या संख्येने रुग्ण ब्रेडचे सेवन करतात. त्याचबरोबर ऑफिसला उशिरा पोहोचल्यानंतरही अनेकजण न्याहारी म्हणून घाईघाईत ब्रेड खाणे पसंत करतात.
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून लोक व्हिडीओ पाहून भडकले आहेत. त्यामुळे तुम्हीदेखील ब्रेड खात असाल तर सावधान. खरेदी करताना सावधानता बाळगण्याची जास्त गरज आहे. अशा प्रकारामुळे माणसांच्या आरोग्यासोबत खेळ होतो. काही पैशांसाठी केलेल्या या कृत्यामुळे एखाद्याचा जीवदेखील जाऊ शकतो.
दरम्यान, यापूर्वीही अनेक गोष्टींमध्ये भेसळ करण्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. भाजी विक्रेते वांग्यांपासून पालकापर्यंतच्या पानांवर रंग फवारताना पाहिला होता जेणेकरून ते ताजे दिसावे. त्याच वेळी, सफरचंद चमकदार करण्यासाठी, काही लोक त्यावर मेणाचा पातळ थर देखील टाकतात. काहीजण भाजी धुताना गलिच्छ पाण्याचा वापर करतात. अशा अनेक घटना समोर आल्या आहेत.