JOIN US
मराठी बातम्या / Viral / रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांनी गैरवर्तन करताच तरुणीने धू धू धूतलं, घटनेचा Video आला समोर

रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांनी गैरवर्तन करताच तरुणीने धू धू धूतलं, घटनेचा Video आला समोर

छोट्या मुलींपासून वृद्ध महिलांपर्यंत जगभरातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर असतो. महिलांवरील गुन्हे रोखण्यासाठी अनेक देशांनी अनेक कायदे लागू केले आहेत.

जाहिरात

व्हायरल

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 3 एप्रिल : छोट्या मुलींपासून वृद्ध महिलांपर्यंत जगभरातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर असतो. महिलांवरील गुन्हे रोखण्यासाठी अनेक देशांनी अनेक कायदे लागू केले आहेत. असे असतानाही गुन्हे सुरूच आहेत. अशा परिस्थितीत मुलींकडे गुन्ह्याविरुद्ध आवाज उठवणे, गुन्हेगारांविरुद्ध लढणे असे काही पर्याय शिल्लक राहतात. त्यामुळे अनेक मुली आता स्वतःच्या बचावासाठी प्रशिक्षण घेतात. यामुळे ते त्यांच्यासोबत गैरव्यवहार करणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवतात. अशीच एक घटना समोर आली असून एका तरुणीने तिच्यासोबत गैरप्रकार करणाऱ्यांना धू धू धूतलं आहे. व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे, वेट्रेस एका टेबलवर बसलेल्या दोन तरुणांना जेवण देताना दिसत आहे. अचानक एक मुलगा उठतो आणि मुलीला त्याच्यासोबत येण्यास भाग पाडतो. मुलगी लगेच विरोध करते आणि त्याला मागे हटवते. मात्र, मुलगा तिला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतो आणि मुलीवर जबरदस्तीने दबाव टाकतो. यावर मुलीला समजते की मला स्वसंरक्षण करावे लागेल. मुलगी अॅक्शन मोडमध्ये येते आणि मुलाला जोरदार ठोसा देते. यानंतर ती दोन्ही मुलांना धू धू धूते. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.

संबंधित बातम्या

चिडलेला मुलगा मुलीवर खुर्चीने हल्ला करतो, पण ती त्याला पकडते आणि परत लाथ मारते.@harikarotalarनावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. तो एक लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आणि सोशल मीडियावर व्हायरल झाला. काहींनी हा खोटा व्हिडिओ असल्याचे म्हटले आहे. एका यूजरने लिहिले की, “हे एका चित्रपटाचे शूटिंग करत असल्याचे दिसते.” त्याचबरोबर अनेक नेटकऱ्यांनी मुलीचे कौतुकही केले.

दरम्यान, यापूर्वीही महिला स्वतःचे संरक्षण करतानाचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशा व्हिडीओंना नेटकरी चांगली पसंती देतात आणि अधिक वेळा व्हिडीओ पाहिले जातात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या