(अख्ख गाव झालं गायब)
प्रतापा राम, प्रतिनिधी जैसलमेर, 5 जून : ‘आपल्या देशातील भुताटकी असलेली ठिकाणं?’ असा प्रश्न गुगलला विचारला तर जिथे जिथे भुताटकी असल्याचा समज असेल अशा ठिकाणांची नावं गुगल दाखवेल. या यादीत कदाचित राजस्थानचं एक गावही सामील असेल. या गावात भूतं आहेत की नाही हे माहित नाही, परंतु तसा समज नक्की आहे. आज आपण पाहूया हे प्रकरण नेमकं काय आहे. राजस्थान म्हटलं की डोळ्यासमोर येतात आलिशान महालं आणि मोठमोठ्या हवेल्या. या हवेल्यांमध्ये पूर्वीच्या राजा-महाराजांचा आजही वावर असेल का? असा प्रश्नच पडतो कधीकधी. परंतु आज आम्ही राजस्थानच्या कुठल्या महालाविषयी नाही, तर एका गावाविषयी माहिती देणार आहोत जिथे तुमच्या आमच्यासारखेच सर्वसामान्य लोक राहायचे. परंतु 200 वर्षांपूर्वी एका रात्रीत हे गाव सुनसान झालं. सगळे गावकरी इथून पळून गेले. राजस्थानच्या जैसलमेरपासून 20 किलोमीटरवर असलेल्या या गावाचं नाव ‘कुलधरा’ असं आहे.
गावात प्रचंड भुताटकी आहे, त्यामुळेच लोक गाव सोडून गेले आणि कधीच परतले नाहीत. शिवाय नव्या लोकांनीही कधी हे गाव गजबजलं नाही, असा समज आहे. परंतु मिळलेल्या माहितीनुसार, फार वर्षांपूर्वी या गावात ब्राह्मणांची वस्ती होती. 1291 साली ब्राह्मणांनीच या गावाची स्थापना केली. त्यावेळी गाव अतिशय समृद्ध होतं. गावातील लोक कलाकुसर होते. शेती, पशुपालन आणि विविध व्यवसायांसाठी येथे सुपीक जमीन आणि वातावरण होतं. Mysterious Village : जगातील रहस्यमय गाव, इथे माणसच काय पशू-पक्षीही आहेत आंधळे गावात सगळं काही सुरळीत सुरू असताना एक ब्राह्मण मुलगी दिवाण सालिम सिंह यांना प्रचंड आवडली. लग्न करेन तर हिच्याशीच, अशी खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली होती. तसा रीतसर प्रस्ताव घेऊन ते तिच्या घरी आले होते. परंतु ब्राह्मणांच्या मुलीचं लग्न त्यांच्याशी होणं हे त्याकाळात अशक्य होतं. दिवाण मात्र त्या मुलीला आपलं सर्वस्व मानून बसले होते. परंतु ब्राह्मणांचा विरोध पाहून त्यांच्यातला हैवान जागा झाला. रागाच्या भरात ते लोकांना प्रचंड त्रास देऊ लागले. लोकांचा छळ करू लागले. अखेर एक वेळ अशी आली की, त्यांची क्रूरता असह्य झाल्याने तेथील लोक गाव सोडून पळून गेले. तेव्हापासून सुनसान झालेलं हे गाव आजही सुनसानच राहिलं आहे. गावात भूतं आहेत, असा समज करून लोक इथे राहण्यास घाबरतात. परंतु खरंच इथे भूत आहे की नाही, याचं उत्तर कोणालाही माहिती नाही. आज या गावात केवळ रिकामी घरं आणि एक मंदिर आहे. त्याकाळात तेथील घरं कशी होती, याचा अंदाज लावण्यासाठी काही घरांचं नव्यानं बांधकाम करण्यात आलं आहे. मात्र त्यांच्यात कोणीही राहत नाही. शिवाय या गाव परिसरात एखादी कंपनी किंवा एखादा व्यवसायदेखील नाही.