JOIN US
मराठी बातम्या / Viral / एकमेकींच्या जीवावर उठल्या दोन मगरी; खतरनाक फायटिंगचा VIDEO VIRAL

एकमेकींच्या जीवावर उठल्या दोन मगरी; खतरनाक फायटिंगचा VIDEO VIRAL

मगरींचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

जाहिरात

मगरींची फायटिंग. (फोटो - इन्स्टाग्राम व्हिडीओ ग्रॅब)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 15 जुलै : मगरीचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आतापर्यंत तुम्ही मगरी ला इतर प्राण्यांची शिकार करताना पाहिलं असेल पण कधी मगरीला मगरीचीच शिकार करताना पाहिलं आहे का? शिकारीचा असाच थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. दोन मगरी एकमेकींच्या जीवावर उठल्या. दोघींमध्ये तुफान फायटिंग पाहायला मिळाली. मगरींमधील लढाईच्या या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मगरीच एकमेकींच्या शत्रू झाल्या आणि एकमेकींवर तुटून पडल्या. हा धक्कादायक असा व्हिडीओ आहे. दोघीही एकमेकींची शिकार करण्याचा प्रयत्न करत आहेत. दोघांमध्येही काँटे की टक्कर होताना दिसते आहे. कुणीच हार मानून मागे हटत नाही आहे. छोट्याशा माशाने केली अवाढव्य मगरीची शिकार, फाडून फाडून खाल्लं; कधीच पाहिला नसेल असा Shocking Video व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एका मगरीने दुसऱ्या मगरीचा पाय आपल्या जबड्यात धरला आहे आणि दुसरीने जबडा. एक मगर दुसऱ्याचा पाय चघळण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरी मगर आपल्या जबड्यात पहिल्याचे डोके दाबण्याचा प्रयत्न करत आहे. एकजण आपला पाय मोकळा करण्याचा प्रयत्न करत असताना, दुसरा आपले डोके सोडवण्यासाठी धडपडताना दिसत आहे. top_tier_wilderness नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यावर लोकांनी आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. मगरीनेच दुसऱ्या मगरीला जिवंत चावून खाल्लं; थरकाप उडवणारं दृश्य कॅमेऱ्यात कैद, VIDEO एका युझरनं हे श्वानांच्या लढाईपेक्षा चांगलं असल्याचं म्हटलं आहे. तर एकाने कोण जिंकलं असा सवाल केला आहे. व्हिडीओत शेवटी नेमकं कोण जिंकलं ते काही दिसत नाही आहे. दोघींमध्येही लढाई सुरूच आहे.

संबंधित बातम्या

तुम्हाला काय वाटतं, कोणती मगर या फायटिंगमध्ये जिंकली असेल आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या