JOIN US
मराठी बातम्या / Viral / पॉवर ऑफ 'आईची चप्पल'! शिकारीसाठी आलेली खतरनाक मगरही धूम ठोकून पळाली; पाहा VIDEO

पॉवर ऑफ 'आईची चप्पल'! शिकारीसाठी आलेली खतरनाक मगरही धूम ठोकून पळाली; पाहा VIDEO

आईच्या चपलेला घाबरणाऱ्या मगरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

जाहिरात

आईच्या चपलेला घाबरणारी मगर.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 08 मार्च :  मगरी चे बरेच व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. कधी वाघ, कधी सिंह, कधी बिबट्या अशा खतरनाक प्राण्यांचीही मगर शिकार करते. हे शक्तिशाली प्राणीही तिच्या तावडीतून सुटू शकत नाहीत. जी मगर या प्राण्यांना घाबरत नाही, जिच्यासमोर या प्राण्यांचा टिकाव लागत नाही, अशी खतरनाक मगर आईच्या चपलेला मात्र घाबरली. शिकारीसाठी आलेली ही मगर आईची चप्पल पाहताच धूम ठोकून पळाली. हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. मुलांना वठणीवर आणण्यासाठी आईकडे कोणतं शस्त्र असेल तर ते तिच्या पायातील चप्पल. कदाचित तुम्हीही तुमच्या आईच्या चपलेचा मार खाल्ला असाल. शिवाय असे बरेच मजेशीर व्हिडीओ पाहिले असतील ज्यात आई चप्पल खरेदी करतानाही ती आपल्या मुलाला मारते. ती चप्पल मुलाला किती लागते, त्यावरून ती किती मजबूत हे ती तपासते. पण कधी विचार केला आहे का तुम्ही आम्ही सर्वजण आईच्या ज्या चपलेला घाबरतो त्या चपलेला कधी मगरही घाबरेल. सेल्फी विथ मगर! सर्वात खतरनाक Selfie घेण्याचा तरुणांचा प्रयत्न; मगरीसमोरच झोपले आणि… तुम्हाला वाचूनच आश्चर्य वाटलं असेल किंबहुना तुम्हाला विश्वासही बसणार नाही. पण नेमकं काय घडलं ते तुम्हीच व्हिडीओत पाहा.

@businessflavors इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडीओ. व्हिडीओत पाहाल एक महिला एका नदीच्या किनाऱ्याजवळ उभी आहे. तिच्यासोबत तिचं श्वानाचं छोटं पिल्लू आहे. ती ज्या पाण्याजवळ आहे त्या पाण्यात मगरही दिसते आहे. एक मगर त्या महिलेच्या दिशेने येताना दिसते. महिला मात्र अगदी शांत आहे. ती बिलकुल घाबरत नाही आणि आहे तिथून हलतही नाही. ना आपल्या श्वानाच्या पिल्लाला आपल्या हातात घेते. वाघालाही जमलं नाही ते ‘वाघाच्या मावशी’ने करून दाखवलं; मांजर-मगरीचा लय डेंजर VIDEO जशी मगर जवळ येते तशी ती आपल्या पायातील चप्पल हातात घेते आणि मगरीला दम देताना दिसते. मगरही तिथंच थांबते आणि तिथून ती पळत मागे सुटते.  मगरीचं असं रूप पाहिल्यानंतर हसू बिलकुल आवरत नाही.

संबंधित बातम्या

असा व्हिडीओ तुम्ही याआधी कधीच पाहिला नसेल. त्यामुळे हा व्हिडीओ कसा वाटला आणि आईच्या चपलेचा तुमचा काही किस्सा असेल तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या